इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे आज खेळाडूंचा लिलाव झाला. दिवसभरात 62 खेळाडूंवर बोली लागली आणि 29 खेळाडू अनसोल्ड राहिले. पहिल्याच प्रयत्नात मुंबई इंडियन्सनं ख्रिस लीनला दोन कोटी मूळ किमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचनं मोठी बोली लागली. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं त्याला आपल्या ताफ्यात घेतले. पण, ऑसींच्याच ग्लेन मॅक्सवेलसाठी किंग्स इलेव्हन पंजाबनं 10.75 कोटी मोजली. मात्र, पॅट कमिन्सनं याही पुढे जात रेकॉर्ड तोड कमाई केली. त्यानं 15.50 कोटीत कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात एन्ट्री मारली. लिलावाच्या पहिल्या सत्रात पॅट कमिन्सला सर्वाधिक 15.50 कोटी रक्कम मिळाले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल ( 10.75 कोटी), ख्रिस मॉरिस ( 10 कोटी), शेल्डन कोट्रेल ( 8.50 कोटी) आणि नॅथन कोल्टर नील ( 8 कोटी) यांचा क्रमांक येतो. आठ संघांनी मिळून एकूण 1 अब्ज 40 कोटी 30 लाख रक्कम मोजली होती.
10:26 PM
पुढील मोसमात कोणता खेळाडू कोणत्या संघांत? संपूर्ण संघांची यादी एका क्लिकवर
09:07 PM

09:06 PM
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबच्या कर्णधारपदाची जबाबदारी लोकेश राहुलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. संघाचे प्रशिक्षक अनील कुंबळे यांनी ही घोषणा केली. तर दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे कायम राहणार आहे.
08:55 PM
वेगवान गोलंदाज डेल स्टेन पुन्हा RCBच्या ताफ्यात
08:54 PM
इसुरू उडानावर रॉयल चॅलेंजर बंगळुरुने लावली ५० लाखांची बोली
08:50 PM
इंग्लंडचा अष्टपैलू टॉम करणवर राजस्थान रॉयलने लावली १ कोटी रुपयांची बोली
08:27 PM
ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टोईनीसवर दिल्ली कॅपिटल्सने लावली ४ कोटी ८० लाखांची बोली
08:18 PM
अँड्र्यू टायवर दुसऱ्या फेरीतही बोली नाही
08:16 PM
डेल स्टेनवर दुसऱ्या फेरीतही बोली नाही
08:15 PM
कॉलीन डी ग्रँडहोमवर बोली नाही
08:12 PM
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज केसरिक विल्यम्सवर बोली नाही
08:10 PM
इंग्लंडचा अष्टपैलू लियम प्लंकेटवर बोली लागली नाही
08:04 PM
केन रिचर्डसनला चार कोटी
06:58 PM

06:45 PM
ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड चेन्नई सुपर किंग्सच्या चमूत
06:31 PM

06:29 PM
सौरभ तिवारी 50 लाखांत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात
06:29 PM
डेव्हीड मिलर राजस्थान रॉयल्स 75 लाख
06:17 PM
पॅट कमिन्ससाठी कशी रंगली चुरस.. पाहा व्हिडीओ..
05:31 PM
पहिल्या सत्रातील खेळाडू व त्यांची किंमत

05:25 PM

05:20 PM
अफगाणिस्तानच्या झहीर खानला वाली नाही

05:17 PM
अॅडम झम्पा, इश सोढी, हेडन वॉल्श अनसोल्ड
05:14 PM
पियुष चावला 6.75 कोटीत चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात
05:12 PM
शेल्डन कोट्रेल पंजाबच्या ताफ्यात... मोजले 8.5 कोटी
05:11 PM
टीम साऊदी अनसोल्ड
05:04 PM
नॅथन कोल्टर नायलला मुंबई इंडियन्सनं 8 कोटीत आपल्या ताफ्यात घेतले
05:02 PM
जयदेव उनाडकट राजस्थान रॉयल्सकडे 3 कोटीत
05:02 PM
मोहित शर्मा, डेल स्टेन, अँड्रू टाय Unsold
04:54 PM
मुश्फीकर रहीम, नमन ओझा, शे होप, कुसल परेरा अनसोल्ड
04:52 PM
जेसन रॉय दिल्ली कॅपिटल्स 1.5 कोटी
04:51 PM
अॅलेक्स करी 2.4 कोटीत दिल्ली कॅपिटल्सकडे
04:30 PM

04:25 PM
स्टुअर्ट बिन्नी अनसोल्ड
04:24 PM
ख्रिस मॉरिसला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं घेतलं 10 कोटींत
04:21 PM

04:20 PM
सॅम कुरणसाठी चेन्नई सुपर किंग्सने मोजले 5.5 कोटी
04:05 PM
कॉलीन डी ग्रँडहोम अनसोल्ड
04:04 PM
युसूफ पठाण अनसोल्ड
04:04 PM
ख्रिस वोक्स 1.5 कोटीत दिल्ली कॅपिटल्सकडे
03:52 PM
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं अॅरोन फिंचला 4.40 कोटीत घेतले संघात
03:49 PM
जेसन रॉय 1.5 कोटीत दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात
03:47 PM
चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी अनसोल्ड
03:43 PM
इयॉन मॉर्गनसाठी कोलकातान नाइट रायडर्सनं मोजले 5.25 कोटी
03:42 PM
रॉबीन उथप्पाला तीन कोटीत राजस्थान रॉयल्सकडे
03:36 PM
कोणाच्या खात्यात किती रक्कम

03:24 PM
