IPL 2026 Orange Cap Race : टॉप ५ मध्ये SRH आणि GT च्या ताफ्यातील फलंदाजांचा जलवा! अव्वल कोण?

टॉप ५ मध्ये SRH आणि GT संघातील प्रत्येकी २-२ फलंदाज

By सुशांत जाधव | Updated: May 13, 2026 12:27 IST2026-05-13T12:19:18+5:302026-05-13T12:27:50+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Heinrich Klaasen, Sai Sudharsan Breach 500-Run Mark In Orange Cap Race During GT Vs SRH Clash | IPL 2026 Orange Cap Race : टॉप ५ मध्ये SRH आणि GT च्या ताफ्यातील फलंदाजांचा जलवा! अव्वल कोण?

IPL 2026 Orange Cap Race : टॉप ५ मध्ये SRH आणि GT च्या ताफ्यातील फलंदाजांचा जलवा! अव्वल कोण?

IPL 2026 Orange Cap Race: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल  २०२६ स्पर्धेतील ५६ वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दमदार अर्धशतक झळकावत GT चा युवा सलामीवीर साई सुदर्शन यंदाच्या हंगामात ५०० धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला फलंदाज ठरला. या कामगिरीच्या जोरावर त्याने ऑरेंज कॅपही आपल्या नावावर केली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

 
क्लासेनचा क्लास नाही दिसला, पण तरीही साई सुदर्शन पडला मागे

सनरायझर्स हैदराबादच्या डावात हेन्रिक क्लासेन याला फलंदाजीतील क्लास दाखवता आला नाही. पण १४ धावांच्या छोटेखानी खेळीसह तो साई सुदर्शनला मागे टाकत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वलस्थानी झेप घेतली. यंदाच्या हंगामात ऑरेंज कॅपची ही चुरस अधिकच रंजक बनली असून, आता सर्वांचे लक्ष आघाडीच्या फलंदाजांच्या कामगिरीवर आहे. इथे पाहूयात हंगाम गाजवणाऱ्या टॉप ५ फलंदाजांची दमदार कामगिरी…

Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!

कामगिरीतील सातत्याच्या जोरावर हेन्री क्लासेन टॉपर

SRH च्या ताफ्यातील दक्षिण आफ्रिकेच्या हेन्रिक क्लासेन याने १२ सामन्यातील १२ डावात ५०.८० च्या सरासरीसह १५३.८० च्या स्ट्राइक रेटसह ५ अर्धशतकाच्या मदतीने ५०८ धावा केल्या आहेत. ऑरेंज आर्मी यंदाच्या हंगामात प्लेऑफ्समध्ये सहज पोहचेल. त्यामुळे कामगिरीतील सातत्य कायम राखत ऑरेंज कॅप पटकावण्याची चांगली संधी त्याच्याकडे आहे.

साई सुदर्शनचा दमदार शो! 

साई सुदर्शन याने सलग तिसऱ्या हंगामात ५०० पेक्षा अधिक धावा करण्याचा खास डाव साधला. यंदाच्या हंगामात पंजाबविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात अवघ्या १३ धावांवर आटोपल्यावर त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध ७३ धावांची दिमाखदार खेळी केली. पण त्यानंतर चार सामन्यात तो धावांसाठी संघर्ष करताना दिसले. MI विरुद्ध भोपळा पदरी पडल्यावर RCB विरुद्ध शतकी खेळीसह त्याने दमदार कमबॅक केले. आता सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात सलग तिसऱ्या अर्धशतकासह त्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील दावेदारी भक्कम केली आहे. साईने गत हंगामात ऑरेंज कॅप पटकावली होती. सलग दुसऱ्यांदा तो हा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.   

टॉप ५ मध्ये SRH आणि GT संघातील प्रत्येकी २-२ फलंदाज

 IPL मधील ५६ व्या सामन्यानंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच खेळाडूंच्या यादीत हेन्रिक क्लासेन आणि साई सुदर्शनशिवाय अभिषेक शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादच्या स्फोटक सलामीवीरानं १२ सामन्यात १ शतक आणि ३ अर्धशतकांसह ४८१ धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा स्टार बॅटर केएल राहुल याने १ शतक आणि ३ अर्धशतकासह ४७७ धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलनं ११ सामन्यातील ११ डावात ४ अर्धशतकाच्या मदतीने ४६७ धावा केल्या आहेत.

Web Title : आईपीएल 2026 ऑरेंज कैप: SRH, GT बल्लेबाजों का शीर्ष 5 में दबदबा।

Web Summary : हेनरिक क्लासेन आईपीएल 2026 ऑरेंज कैप की दौड़ में सबसे आगे हैं। साई सुदर्शन भी शीर्ष दावेदार हैं। SRH और GT के बल्लेबाजों का शीर्ष 5 में दबदबा है, जो लगातार प्रदर्शन और प्रतिष्ठित कैप के लिए रोमांचक प्रतिस्पर्धा दिखा रहे हैं।

Web Title : IPL 2026 Orange Cap: SRH, GT batsmen dominate top 5 race.

Web Summary : Henrik Klaasen leads the IPL 2026 Orange Cap race after a strong performance. Sai Sudharsan is also a top contender. SRH and GT batsmen dominate the top 5, showcasing consistent performances and exciting competition for the coveted cap.