ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!

ईशान किशनने MS धोनी समोर येलो जर्सीतील चाहत्यांना डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 17:39 IST2026-05-19T17:21:07+5:302026-05-19T17:39:42+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 CSK vs SRH Ashwin to angry CSK Fans Enjoy Ishan Kishan Celebration Why Bring Ego Into it | ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!

ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!

Ashwin To Angry CSK Fans Says Enjoy Ishan Kishan Celebration :  चेपॉकच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात ईशान किशनच्या शानदार खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने प्लेऑफ्सचं तिकीट पक्के केले. दुसरीकडे MS धोनीच्या यंदाच्या हंगामातीलच नव्हे तर कदाचित IPL मधील शेवटच्या सामन्यात CSK चा माजी कर्णधाराला विजयी गिफ्ट देण्याचा डाव फसला. या पराभवामुळे CSK चा प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकून राहण्याचं गणितही बिघडलं आहे. या सामन्यात ईशान किशन याने स्फोटक फलंदाजीशिवाय 'व्हिसल पोडू' सेलिब्रेशनसह सर्वांचे लक्षवेधून घेतले. यावर रंगलेल्या चर्चेत आर. अश्विन यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

ईशान किशनने MS धोनी समोर येलो जर्सीतील चाहत्यांना डिवचलं

 



या सामन्यात ईशान किशन त्याच्या दमदार खेळीनंतर खास सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर विकेट किपर बॅटरनं ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशन करत MS धोनीसमोर  चेपॉकच्या स्टेडियमवरील चाहत्यांना डिवचले. शिट्टी वाजवत त्याने चला घरी निघा...असा इशारा केला. त्याचा विजयानंतरचा आनंद व्यक्त करण्याचा खास अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)

आर. अश्विन म्हणाला मनावर घेऊ नका!

 चेन्नई सुपर किंग्स आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार आर. अश्विन याने ईशान किशनच्या दमदार खेळीचं कौतुक करताना त्याच्या सेलिब्रेशनवरही भाष्य केले आहे. आपल्या युट्यूब चॅनेलवरील खास कार्यक्रमात तो म्हणाला की, "मी त्यावर फार खोलात जाणार नाही. सामन्यानंतर त्याने केलेल्या सेलिब्रेशनबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे. अरे जाऊ द्या ना… हे सगळे खेळाडू आहेत, भावना हा खेळाचाच भाग आहे. ते वैयक्तिकरित्या घेऊ नका, त्याचा आनंद घ्या," असं अश्विन म्हणाला. मैदानावरील एका छोट्याशा सेलिब्रेशनला वैयक्तिक अपमानाचं रूप का दिलं जातं? असा सवालही त्याने उपस्थित केला.

ईशानचा शानदार शो!

चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने डेवॉल्ड ब्रेविसच्या ४४ धावांच्या खेळीच्या जोरावर १८० धावा करत सनरायझर्स हैदराबादसमोर १८१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर फ्लॉप ठरल्यावर ईशान किशन याने शानदार खेळी केली. त्याने ७० धावांच्या दमदार खेळीसह संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. 
 
CSK च्या प्लेऑफ्सच्या आशा RR वर अवलंबून

लखनौ सुपर जायंट्सने दिलेल्या पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादसाठी प्लेऑफ्सचं समीकरण कठीण झाले होते. पण दमदार कमबॅकसह त्यांनी स्वत:सोबत गुजरात टायटन्सच्या संघालाही प्लेऑफ्सचं तिकीट मिळवून दिलं. दुसरीकडे पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्सचा प्लेऑफ्सचा मार्ग खडतर झाला आहे. आता त्यांना उर्वरित एक सामना जिंकून RR आणि पंजाब किंग्सच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागणार आहे. हे सगळं करत असताना नेट रनरेटमुळे गणित बिघडणार नाही, याचीही त्यांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. 

Web Title : ईशान किशन ने 'व्हिसल पोडू' से धोनी के प्रशंसकों को छेड़ा।

Web Summary : ईशान किशन की विस्फोटक बल्लेबाजी और 'व्हिसल पोडू' उत्सव ने सनराइजर्स हैदराबाद की सीएसके पर जीत के बाद विवाद खड़ा कर दिया। इस हार से सीएसके के प्लेऑफ की संभावना जटिल हो गई, जो अब अन्य मैचों के परिणामों पर निर्भर है। किशन की 70 रनों की पारी महत्वपूर्ण थी।

Web Title : Ishan Kishan taunts Dhoni's fans with 'Whistle Podu' celebration.

Web Summary : Ishan Kishan's explosive batting and 'Whistle Podu' celebration stirred controversy after Sunrisers Hyderabad defeated CSK. The loss complicates CSK's playoff chances, now reliant on other match outcomes. Kishan's innings of 70 runs was crucial.