IPL 2025 MI vs DC 63rd Match Player to Watch Suryakumar Yadav and Rohit Sharma Mumbai Indians : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील साखळी फेरीतील ६३ व्या सामन्याला प्लेऑफ्सच्या दृष्टीने 'एलिमिनेटर' चं स्वरुप आलं आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील ही लढत मुंबई येथील वानखेडेच्या मैदानात रंगणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईकरांनी साखळी फेरीत याआधी दिल्लीकरांना त्यांच्या घरात जाऊन मात दिलीये. त्यामुळे घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचं पारडे जड आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
MI च्या भरवशाच्या जोडीसमोर असेल 'बापू'चं चॅलेंज
मुंबई इंडियन्सचा संघ हा काही एका दोघांवर अवलंबून नाही. तरीपण या महत्त्वपूर्ण सामन्यात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यांच्यावर नजरा असतील. दोघेही दमदार कामगिरी करत आहेत. पण दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात एक गोलंदाज त्यांच्यासमोर आव्हान निर्माण करू शकतो. तो गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे टीम इंडियाचा बापू अर्थात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल.
कोण आहे MS धोनीचा ड्युप्लिकेट! ज्यानं दिल्लीच्या स्टेडियममध्ये केली हवा
सूर्यकुमार यादवसह रोहित जबरदस्त फॉर्ममध्ये, पण...
सूर्यकुमार यादव हा यंदाच्या हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसला. त्याने १२ सामन्यात ६३.७५ च्या सरासरीसह १७०.५७ च्या स्ट्राइक रेटनं ५१० धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यात अडखळत खेळणारा रोहित शर्माही रंगात आलाय. त्याच्या खात्यातही ३०० पेक्षा अधिक धावा जमा आहेत. दोघांनी दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील गोलंदाजांसमोर जबरदस्त बॅटिंग केलीय. पण अक्षर पटेल त्यांच्यावर भारी ठरू शकतो.
MI च्या तगड्या फलंदाजांसमोर अक्षर पटेल का ठरू शकतो डोकेदुखी?
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील दोन्ही मॅच विनर बॅटर अर्थात रोहित आणि सूर्या दोघांचे लेफ्ट आर्म स्पिनर विरुद्धची कामगिरी टेन्शन वाढवणारी आहे. डावखुऱ्या फिरकीपटूसमोर या जोडीचा स्ट्राइक रेट १०० च्या आत येतो. हीच गोष्ट अक्षर पटेलसाठी जमेची बाजू ठरू शकते. त्याच्या जोडीला कुलदीपही हा आणखी एक डावखुरा फिरकीपटू दिल्लीच्या ताफ्यात आहे. हा अडथळा पार करून जोडी जमली तर मुंबई इंडियन्सला रोखणं अधिक कठीण असेल, यात शंका नाही.