IPL 2025 KKR vs CSK 5th Match Player to Watch Sam Curran Chennai Super Kings : इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील १८ वा हंगाम महेंद्रसिंह धोनीच्या CSK संघासाठी भयावह स्वप्नासारखाच आहे. मुंबई इंडियन्सच्या बरोबरीनं सर्वाधिक ५ वेळा चॅम्पियन ठरलेला संघ यंदाच्या हंगामात प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर होणारा पहिला संघ ठरला. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात १६ हंगामात चौथ्यांदा त्यांच्यावर प्लेऑफ्स आधीच स्पर्धेतून आउट होण्याची नामुष्की ओढावली. याआधी २०२०,२०२२ आणि २०२४ च्या हंगामात चेन्नईची अशी अवस्था झाली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संघातील तगड्या बॅटर्संनी लावला चुना, घरवापसी करणाऱ्याने दाखवली धमक
CSK चा संघ लिलावात संघ बांधणी करताना कुठे तरी कमी पडला. त्यात मोठी रक्कम मोजून कायम ठेवलेल्या भरवशाच्या गड्यांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. ऋतुराज गायकवाड (१८ कोटी), शिवम दुबे (१२ कोटी) आणि रवींद्र जडेजा (१८) कोटी हे गडी बिन कामाचे ठरले. या सर्वात भाव घसरलेल्या गडी शेवटच्या टप्प्यात कमालीची कामगिरी करताना दिसतोय. ते नाव म्हणजे सॅम कुरेन. ११ सामन्यात फक्त ५ सामन्यात त्याला संधी मिळाली. यात चार डावत अपयशी ठरल्यावर त्याने संघाकडून ८२ धावांची खेळी केली. यंदाच्या हंगामात CSK च्या संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च खेळी ठरलीये. या खेळीसह तो चेन्नई सुपर किंग्जचा बॉसच झालाय.
IPL 2025 : जलदगती गोलंदाजांना नडतोय; पण फिरकीपटूंसमोर 'तलवार म्यान' करुन मागे सरतोय
भाव घसरल्यावर तोरा दाखवला, आता सातत्य कायम राखत खास डाव साधण्याची कसोटी
२०१९ मध्ये सॅम कुरेन याने पंजाब किंग्जच्या ताफ्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २०२० आणि २०२१ च्या हंगामात तो ५.५० कोटींच्या प्राइज टॅगसह या संघातून खळताना पाहायला मिळाले. मागील दोन हंगामात पंजाब संघाने १८.५० कोटी एवढ्या तगड्या पॅकेजसह त्याला मोठी किंमत दिल्याचे पाहायला मिळाले. पण यंदाच्या हंगामात त्याचा भाव कमालीचा घसरला. पंजाबने नारळ दिल्यावर २.४० कोटींसह तो पुन्हा CSK च्या ताफ्यात आला. उर्वरित सामन्यात आपल्यातील धमक दाखवून तो आगामी हंगामासाठी चेन्नईच्या संघातील आपली जागा भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
IPL मधील कामगिरी
इंग्लंडचा ऑलराउंडर सॅम कुरेन याने आयपीएलच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये ६४ सामन्यात ९९७ धावा केल्या असून ८८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. फलंदाजीशिवाय गोलंदाजीत त्याच्या खात्यात ५९ विकेट्स जमा आहेत. ११ धावा खर्च करून ४ विकेट्स ही त्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. २०१९ च्या हंगामात पंजाबच्या संघाकडून पदार्पणाच्या सामन्यात त्याने ही कामगिरी नोंदवली होती.
Web Title: IPL 2025 KKR vs CSK 5th Match Lokmat Player to Watch Sam Curran Chennai Super Kings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.