Kuldeep Yadav IPL 2022, DC vs KKR Live Updates : W,4,W,W,1,W,W!; कुलदीप यादवने लावली कोलकाताची वाट, ७ चेंडूंत घेतल्या ५ विकेट्स, Video 

IPL 2022, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Updates : आयपीएलच्या २०२० व २०२१ या पर्वात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) याने एकच विकेट घेतली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 08:27 PM2022-04-28T20:27:57+5:302022-04-28T20:29:05+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, DC vs KKR Live Updates : W,4,W,W,1,W,W by Kuldeep Yadav in last 7 balls against Kolkata Knight Riders, Watch Video  | Kuldeep Yadav IPL 2022, DC vs KKR Live Updates : W,4,W,W,1,W,W!; कुलदीप यादवने लावली कोलकाताची वाट, ७ चेंडूंत घेतल्या ५ विकेट्स, Video 

Kuldeep Yadav IPL 2022, DC vs KKR Live Updates : W,4,W,W,1,W,W!; कुलदीप यादवने लावली कोलकाताची वाट, ७ चेंडूंत घेतल्या ५ विकेट्स, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Live Updates : आयपीएलच्या २०२० व २०२१ या पर्वात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) याने एकच विकेट घेतली होती. त्यानंतर KKRने त्याला रिलीज केले आणि आयपीएल २०२२त तोच कुलदीप यादव KKRविरुद्ध राग काढताना दिसतोय... दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कुलदीपने आतापर्यंत ८ सामन्यांत १५ विकेट्स घेतल्या आहेत. आजही त्याने ८व्या षटकात KKRला सलग दोन धक्के दिले. पदार्पणवीर बाबा इंद्रजित ( ६) आणि सुनील नरीन ( Golden Duck) यांना त्याने बाद केले. या कामगिरीसह त्याने KKRविरुद्ध मागील ७ चेंडूंत ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. 

दिल्लीकडून आज पदार्पण करणाऱ्या चेतन सकारियाने ( Chetan Sakariya) पहिल्याच षटकात कोलकाताला मोठा धक्का दिला. आरोन फिंचचा ( ३) त्रिफळा उडवून दिल्लीच्या चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. त्यानंतर पाचव्या षटकात अक्षर पटेलने KKRला आणखी एक धक्का देताना वेंकटेश अय्यरला ( ६) बाद केले. कोलकाताची अवस्था २ बाद २२ अशी झाली होती. ८व्या षटकाच्या दुसऱ्या व तिसऱ्या चेंडूवर कुलदीपने KKRला दोन धक्के दिले.

KKRविरुद्धच्या मागील सामन्यात कुलदीपने ३५ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्या सामन्यातील अखेरच्या षटकात त्याने W, 4, W, W अशी कामगिरी केली होती आणि आज त्याने 1, W, W अशी कामगिरी करताना ७ चेंडूंत ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. कोलकाताच्या १० षटकांत ४ बाद ५६ धावा झाल्या आहेत. 

पाहा व्हिडीओ... 

 

 

Web Title: IPL 2022, DC vs KKR Live Updates : W,4,W,W,1,W,W by Kuldeep Yadav in last 7 balls against Kolkata Knight Riders, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.