IPL 2020 : आठ फ्रँचायझींच्या ताफ्यात नवे भीडू; जाणून घ्या तुमच्या आवडत्या संघात कोणता नवीन खेळाडू खेळणार
IPL 2020 : कोरोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे खेळवण्यात येणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व फ्रँचायझींनी सरावाला सुरुवात केली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा संघ या आठवड्याच्या शेवटी सरावाला मैदानावर उतरेल. यंदाच्या आयपीएलसाठी झालेल्या लिलावात फ्रँचायझींनी आपापल्या ताफ्यात काही नव्या भीडूंना करारबद्ध केलं आहे. चला तर मग जाणून घेऊया... कोणत्या संघानं कोणत्या खेळाडूला किती रुपयांत करारबद्ध केलं ते...