त्या भ्याड हल्ल्यात काकांपाठोपाठ आत्ये भावाचेही निधन; सुरेश रैनाची आरोपींना शिक्षा देण्याची मागणी

सुरेश रैनाच्या आत्येची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 02:44 PM2020-09-01T14:44:31+5:302020-09-01T14:46:29+5:30

whatsapp join usJoin us
'My uncle was slaughtered to death' - Suresh Raina reacts to attack on family in Pathankot | त्या भ्याड हल्ल्यात काकांपाठोपाठ आत्ये भावाचेही निधन; सुरेश रैनाची आरोपींना शिक्षा देण्याची मागणी

त्या भ्याड हल्ल्यात काकांपाठोपाठ आत्ये भावाचेही निधन; सुरेश रैनाची आरोपींना शिक्षा देण्याची मागणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देवैयक्तिक कारणास्तव सुरेश रैनानं आयपीएलमधून माघार घेतलीत्याच्या आत्येच्या घरी अज्ञात इसमांनी हल्ला केला, त्यात काकांचे निधन झाले

चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) उपकर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानं इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13 व्या मोसमातून माघार घेतली. वैयक्तिक कारणास्तव त्यानं ही माघार घेतल्याचे CSKच्या सीईओंनी सांगितलं. दुबईहून मायदेशात परतण्यामागे रैनाचं नेमकं कारण काय, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. याच दरम्यान रैनाच्या आत्याच्या घरी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आणि त्यात काकांचं निधन झाले. मंगळवारी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आत्ये भावानेही प्राण गमावले. रैनानं या आरोपींना शिक्षा देण्याची मागणी पंजाब पोलिसांकडे केली आहे.

त्या रात्री नेमकं काय घडलं?
19 ऑगस्टला रैनाचे नातेवाईक घराच्या टेरेसवर झोपले असताना मध्यरात्री त्यांच्यावर अज्ञात इसमांनी प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला. रैनाच्या काकांचे पठाणकोट येथील थरीयाल गावात झालेल्या हल्ल्यात निधन झाले असून आत्याची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे रैना मायदेशात परतला. रैनाच्या वडीलांची बहिण आशा देवी यांची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरीकडे त्याचे 58 वर्षीय काका अशोक कुमार यांचे निधन झाले. रैनाचे आत्ये भाऊ कौशल कुमार ( 32 वर्ष) आणि अपीन कुमार ( 24 वर्ष) यांनाही दुखापत झाली आहे. चोरीच्या उद्देशानं हा हल्ला झाल्याची चर्चा आहे.

रैना काय म्हणाला?
''पंजाबमध्ये माझ्या कुटुंबीयांसोबत जे घडलं ते अत्यंत भयानक होतं. माझ्या काकांची कत्तल करण्यात आली, माझी आत्या आणि दोन आत्येभाऊ हे गंभीर जखमी झाले. दुर्दैवानं काल रात्री एका आत्ये भावाचंही निधन झालं. आत्येची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे आणि ती लाईफ सपोर्टवर आहे,''असे रैनानं ट्विट केलं.

त्यानं पुढे लिहिलं की,''त्या रात्री नेमकं काय घडलं आणि कुणी केलं हे आतापर्यंत तरी आम्हाला कळलेलं नाही. पंजाब पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालावं, ही विनंती. हे भयंकर कृत्य कोणी केलं याची माहिती आम्हाला मिळायलाच हवी. अशा आरोपींना आणखी अपराध करण्यासाठी मोकळं सोडता कामा नये.''

Web Title: 'My uncle was slaughtered to death' - Suresh Raina reacts to attack on family in Pathankot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.