IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्ससाठी अखेर आनंदाची बातमी आली; MS Dhoniचं टेंशन हलकं झालं

IPL 2020 : दीपक चहर आणि ऋतुराज यांच्यासह सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 03:24 PM2020-09-01T15:24:40+5:302020-09-01T15:26:23+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: CSK players and support staff test negative for COVID-19, to undergo one more test | IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्ससाठी अखेर आनंदाची बातमी आली; MS Dhoniचं टेंशन हलकं झालं

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्ससाठी अखेर आनंदाची बातमी आली; MS Dhoniचं टेंशन हलकं झालं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देचेन्नईच्या ताफ्यात फॅफ ड्यू प्लेसिस आणि लुंगी एऩ गिडी दाखलहरभजन सिंगचे 'तळ्यात मळ्यात'! 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमातही जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला एकमागून एक धक्के बसत आहे. दोन खेळाडूंसह स्टाफ सदस्य अशी एकूण 13 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर उपकर्णधार सुरेश रैनानं घेतलेली माघार CSKसाठी डोकेदुखी ठरणारी आहे. त्यामुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं टेंशन वाढलेलं होतं. दीपक चहर आणि ऋतुराज यांच्यासह सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं संघातील अन्य सदस्यांना पुन्हा क्वारंटाईन व्हावं लागलं आणि त्यामुळे त्यांना सरावासाठीही मैदानावर उतरता आलेलं नाही. मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ससाठी एक आनंदाची बातमी आली आहे. 

त्या भ्याड हल्ल्यात काकांपाठोपाठ आत्ये भावाचेही निधन; सुरेश रैनाची आरोपींना शिक्षा देण्याची मागणी

दुबईत दाखल झाल्यानंतर अन्य संघांप्रमाणे चेन्नई सुपर किंग्सचे सदस्यही 6 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये होते. 28 ऑगस्टला चेन्नईचा संघ सरावासाठी मैदानावर उतरणे अपेक्षित होतं, परंतु चहर आणि गायकवाड यांच्यासह स्टाफ सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् सर्व गणित बिघडले. त्यात प्रमुख खेळाडू सुरेश रैनानं वैयक्तिक कारण देत आयपीएलमधूनच माघार घेतली. चेन्नईच्या कोरोना पॉझिटिव्ह सदस्यांची पुन्हा चाचणी केली गेली आणि त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. त्यांची आणखी एकदा कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर 3 सप्टेंबरला सर्व खेळाडू सरावाला सुरुवात करतील. पण, चहर आणि गायकवाडला 12 सप्टेंबरपर्यंत क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.

दरम्यान दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू फॅफ ड्यू प्लेसिस आणि लुंगी एऩगिडी मंगळवारी पहाटे दुबईत दाखल झाले आहेत. आता त्यांना 6 दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.
 


हरभजन सिंगचे 'तळ्यात मळ्यात'! 

संघातील सर्वात अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगही यंदाच्या आयपीएलमधून माघार घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.  भज्जीनं सीएसकेच्या चेन्नईत झालेल्या सराव शिबिरात सहभाग घेतला नव्हता आणि तो संयुक्त अरब अमिराती येथे नंतर दाखल होणार आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय संघाचा फिरकीपटू मंगळवारी यूएईसाठी रवाना होणार आहे, परंतु दुबईतील संघातील कोरोना सदस्यांची संख्या लक्षात घेता, तो पुनर्विचार करत आहे. ''मंगळवारी हरभजन दुबईत दाखल होणार आहे, परंतु सीएसकेतील सद्याची स्थिती पाहता, त्याची चिंता वाढली आहे. त्यामुळे तो दुबईत दाखल होण्याची तारीख बदलू शकतो किंवा यंदाच्या आयपीएलमधून माघार घेऊ शकतो,''असे त्याच्या नजिकच्या व्यक्तीनं सांगितलं आहे. मात्र, यावर अद्याप हरभजनची प्रतिक्रिया आलेली नाही.

Web Title: IPL 2020: CSK players and support staff test negative for COVID-19, to undergo one more test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.