Join us
Daily Top 2Weekly Top 5

MI ब्युटी विथ परफेक्ट ड्युटी! डेब्यू गर्ल वैष्णवीच्या मॅजिकसमोर शेफाली ठरली फिकी, पण... (VIDEO)

मेगा लिलावात अनसोल्डचा टॅग, बदली खेळाडूच्या रुपात धमाकेदार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 23:12 IST

Open in App

महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने बदली खेळाडूच्या रुपात अनसोल्ड वैष्णवी शर्माला आपल्या संघांत घेतलं. एवढेच नाही तर हरमनप्रीत कौरन अँण्ड मुंबई  इंडियन्स संघ व्यवस्थापनाने भारताच्या युवा चेहऱ्यावर भरवसा दाखवत तिला दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पदार्पणाची संधी दिली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दिल्ली कॅपिटल्सच्या सलामी जोडीनं दाखवली पॉवर

वडोदराच्या मैदानात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात WPL मधील १३ वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात १५४ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने या धावसंख्येचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली. शेफाली वर्मा आणि लिझेल ली (Lizelle Lee) या जोडीनं पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत MI चं टेन्शन वाढवलं होते. 

WPL 2026 : भाव न मिळालेली सुंदरी आता 'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीमुळे चर्चेत; जाणून घ्या सविस्तर

MI च्या ब्युटीच दमदार पदार्पण, पहिल्याच षटकात दाखवलं मॅजिक अन्...

दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील ८ व्या षटकात मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरनं पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या वैष्णवीच्या हाती चेंडू सोपवला. बदली खेळाडूच्या रुपात MI च्या ताफ्यात सामील झालेल्या ब्युटीनं पदार्पणातील सामन्यातील पहिल्याच षटकात सेट झालेली जोडी फोडत आपली ड्युटी एकदम परफेक्ट निभावली. तिने शेफालीच्या रुपात WPL मधील पहिले यश नोंदवत MI नं  दिलेल्या संधीच सोन करून दाखवलं.

मेगा लिलावात अनसोल्डचा टॅग, बदली खेळाडूच्या रुपात धमाकेदार एन्ट्री

WPL च्या मेगा लिलावात वैष्णवी शर्मानं ३० लाख रुपयांसह नाव नोंदणी केली होती. पण कोणत्याही फ्रँचायझी संघाने तिच्यावर बोली लावली नाही. WPL मध्ये अनसोल्ड राहिल्यावर तिला भारतीय टी-२० संघात स्थान मिळाले.  श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत तिने आपल्या गोलंदाजीनं प्रभावित केले. WPL मध्ये MI च्या ताफ्यातील जी कमलिनी दुखापतग्रस्त होऊन स्पर्धेतून बाहेर पडली. तिच्या जागी मुंबई इंडियन्सच्या संघाने ३० लाख या मूळ किंमतीसह वैष्णवीला आपल्या संघात सामील करून घेतले होते.  

दिल्लीने मारली बाजी! जेमिमाचं कडक अर्धशतक

मुंबई इंडियन्सच्या संघाकडून पदार्पणात वैष्णवीनं लक्षवेधून घेतले. पण या सामन्यात जेमिमाच्या दिल्लीनं बाजी मारली. मुंबईच्या संघाकडून नॅट सायव्हर ब्रंटनं ४५ चेंडूत केलेल्या ६५ धावा या या सामन्यात कोणत्याही बॅटरनं केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. याशिवाय हरमनप्रीत कौरनं ३३ चेंडूत केलेली ४१ धावांच्या खेळी केली होती. या दोघींच्या खेळीवर दिल्लीकडून लीझेल लीची २८ चेंडूतील ४६ धावांची खेळी आणि जेमिमा रॉड्रिग्जचे अर्धशतक भारी पडले. जेमिनं ३७ चेंडूत नाबाद ५१ धावांची खेळी करत संघाला एक षटक आणि ७ विेकेट्स राखून विजय मिळवून दिला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : MI's Vaishnavi Shines on Debut, Shefali Fades (VIDEO)

Web Summary : Vaishnavi Sharma impressed in her WPL debut for Mumbai Indians, taking a crucial wicket. Despite her efforts and Harmanpreet Kaur's contribution, Jemimah's fifty led Delhi Capitals to victory. Vaishnavi, previously unsold, replaced the injured G. Kamalini.
टॅग्स :महिला प्रीमिअर लीगशेफाली वर्माहरनमप्रीत कौरमुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स