Indian men's T20 captain Suryakumar Yadav BCCI headquarters Video : भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आशिया कप स्पर्धेसाठी संघ निवडीसाठी आयोजित बैठकीसाठी बीसीसीआयच्यामुंबईतील मुख्यालयात पोहचला आहे. BCCI च्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय टी-२० संघ निवडला जाणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सूर्यकुमार यादवच्या कडक स्टाइलसह IPL छत्रीही ठरली लक्षवेधी
सध्या मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. सूर्यकुमार यादवही मुंबईत जोरदार पाऊस पडतोय, असे सांगताच बीसीसीआयच्या मुख्यालयात एन्ट्री मारताना दिसून आले. काळ्या रंगातील टी शर्ट, गळ्यात लॉकेट अन् व्हाइट शूजमधील लूक एकदम परफेक्ट करण्यासाठी सूर्यकुमार यादवनं ब्लॅक सनग्लासेसलाही पसंती दिली होती. RevSportz Global नं शेअर केलेला सूर्यकुमार यादवच्या कडक एन्ट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी अलिशान कारमधून उतरल्यावर सूर्यकुमार यादव IPL असं लिहिलेल्या छत्रीतून ऑफिसमध्ये एन्ट्री मारताना दिसून आले. क्रिकेटरच्या कडक लूकसह ब्लू रंगाची IPL छत्रीही लक्षवेधी ठरली.
पावसाचा जोर कायम, परिणामी...आशिया कप स्पर्धेसाठी निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि सूर्यकुमार यादव दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय संघाची घोषणा करणार होते. पण पावसाचा जोर कायम असल्यामुळे ही पत्रकार परिषद नियोजित वेळेत होऊ शकलेली नाही. आता पत्रकार परिषदेशिवायच संघाची घोषणा होणार का? ते पाहण्याजोगे असेल.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर सूर्याच्या खांद्यावर आलीये जबाबदारी
२०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहित शर्मानं छोट्या फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर भारतीय टी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर पडली. त्याच्या नेतृत्वाखाली अनेक नव्या चेहऱ्यांना टी-२० संघात संधी मिळाली आहे. त्याच्या नेतृ्वाखालील संघाने कामगिरीही एकदम दमदार केलीये. त्यामुळे आशिया कप स्पर्धेसाठी आधीचा फॉर्म्युला कायम राहणार की, काही जुन्या अन् स्टार खेळाडूंसाठी नव्या चेहऱ्यांचा पत्ता कट होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.