India Women vs Sri Lanka Women Live Streaming 2nd T20I : भारत महिला आणि श्रीलंका महिला यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने विजयी सलामी दिली. ज्या मैदानात पहिला सामना खेळवण्यात आला त्याच विशाखापट्टणम येथील ACA–VDCA क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघातील दुसरा सामना रंगणार आहे. इथं एक नजर टाकुयात लाईव्ह स्ट्रीमिंग, टीव्ही प्रक्षेपण, सामन्याची वेळ आणि थेट प्रेक्षण कुठे पाहता येईल यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्मृती मानधनासह शफाली वर्माच्या कामगिरीवर असतील नजरा
आयसीसी महिला विश्वचषकातील ऐतिहासिक विजयानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या द्विपक्षीय टी-२० मालिकेतून आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या तयारीची सुरुवात केली आहे. पहिल्या टी-२० सामन्यात जेमिमा रॉड्रिग्स हिने नाबाद अर्धशतकी खेळीसह खास छाप सोडली. दुसऱ्या सामन्यात तिच्यासह स्मृती मानधना आणि शफाली वर्माच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील.
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठे खेळवला जाणार?
भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला यांच्यातील दुसरा टी-20 सामना मंगळवारी, २३ डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सात वाजता विशाखापट्टणमच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघातील कर्णधार ६ वाजून ३० मिनिटांनी नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.
भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना टेलिव्हिजनसह LIVE Streaming च्या माध्यमातून कुठे पाहता येईल?
भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला दुसरा टी-20 सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर थेट प्रेक्षपित होईल. ऑनलाईनच्या माध्यमातून जिओहॉटस्टार आणि वेबसाईटवर हा सामना लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल.
पहिल्या सामन्यात जेमिमाचा जलवा; मॅच जिंकली तरी कर्णधार हरमनप्रीत नाखुश
पहिल्या टी-२० सामन्यात भारताने श्रीलंकेला ६ बाद १२१ धावांवर रोखत ८ विकेट्स राखून एकतर्फी मात दिली होती. जेमिमा रोड्रिग्जने नाबाद ६९ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौरने सामन्यानंतर फिल्डिंगमधील चुकांवर नाराजी व्यक्त केली. सर्वोत्तम फिल्डिंगचा नजराणा पेश करत टीम इंडियातील सर्वजणी कर्णधार हरमनप्रीत कौरची नाराजी दूर करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.
IND-W vs SL-W हेड-टू-हेड रेकॉर्ड
महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचा श्रीलंकेविरुद्ध वर्चस्व राहिलं आहे. आतापर्यंत खेळलेल्या २७ सामन्यांपैकी भारताने २१ सामने जिंकले आहेत. घरच्या मैदानावर भारताची आघाडी ५-२ अशी असून, विशाखापट्टणमच्या सामन्यातही भारतच प्रबळ दावेदार मानला जात आहे.