IND Vs WI, T20 World Cup 2026 : कधी कुठं अन् कसा पाहता येईल भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील 'क्वार्टर फायनल'चा थरार

एक नजर टाकुयात कधी कुठं रंगणार सामना? कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? यासंदर्भातील सविस्तर माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 02:36 IST2026-03-01T02:35:45+5:302026-03-01T02:36:43+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India Vs West Indies Live Streaming ICC T20 World Cup 2026 When And Where To Watch IND Vs WI TV And Online Know Head To Head Record | IND Vs WI, T20 World Cup 2026 : कधी कुठं अन् कसा पाहता येईल भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील 'क्वार्टर फायनल'चा थरार

IND Vs WI, T20 World Cup 2026 : कधी कुठं अन् कसा पाहता येईल भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील 'क्वार्टर फायनल'चा थरार

India Vs West Indies Live Streaming ICC T20 World Cup 2026 : टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सेमीफायलमधील तीन संघ ठरले आहेत. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील लढतीनंतर यंदाच्या हंगामातील सेमीफायलचं चित्र स्पष्ट होणार आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात या दोन्ही संघातील सामना खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघातील लढतीला क्वार्टरफायनलचं स्वरुप आले आहे. या सामन्यात पॉवर हिटिंगचा खास नजराणा प्रेक्षकांना अनुभवायला मिळू शकतो. एक नजर टाकुयात कधी कुठं रंगणार सामना? कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? यासंदर्भातील सविस्तर माहिती 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

दोनवेळा चॅम्पियन ठरलेल्या संघांमध्ये रंगणार क्वार्टरफायनलचा थरार 

सुपर ८ फेरीतील दोन्ही संघांनी झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवला असून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दोन्ही संघांना पराभूत करत या गटातून सेमीफायनलचं तिकीट पक्के केले आहे. दुसऱ्या गटातून इंग्लंडच्या पाठोपाठ न्यूझीलंचा संघाने बाद फेरीत प्रवेश केला आहे. चौथ्या सेमीफायनलिस्टसाठी प्रत्येकी दोन वेळा जेतेपद मिळवणारे संघ समोरासमोर भिडणार आहेत.

T20 World Cup New Record : पाकच्या साहिबजादानं साधला मोठा डाव; किंग कोहलीचा ऑलटाइम रेकॉर्ड मोडला

कसा आहे IND vs WI यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड?

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये आतापर्यंत ३० सामने खेळवण्यात आले आहेत. यातील १९ सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली असून १० सामन्यात वेस्ट इंडिजला यश मिळाले आहे. दोन्ही संघातील एक सामना हा अनिर्णित राहिला आहे. एकंदरीत टी-२० सामन्यात भारतीय संघ आघाडीवर असला तरी वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजचा दबदबा राहिलाय. आतापर्यंत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दोन्ही संघ ४ वेळा समोरासमोर आले आहेत. यात वेस्ट इंडिज ३-० अशी बाजी मारली आहे 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना कधी आणि कुठे?

  • सामन्याचे ठिकाण- ईडन गार्डन्स, कोलकाता
  • तारीख: रविवार, १ मार्च
  • वेळ: सायंकाळी. ७:०० वाजता 
  •  थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
  • टीव्ही प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
  • लाईव्ह स्ट्रीमिंग: जिओ हॉटस्टार अ‍ॅप आणि वेबसाईट
     

भारतीय संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग

वेस्ट इंडिजचा संघ :

शई होप (कर्णधार व यष्टिरक्षक), ब्रँडन किंग, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रॉस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्डे, गुडाकेश मोती, शमार जोसेफ, अकील होसेन, क्वेंटिन सॅम्पसन, जेडन सील्स, जॉन्सन चार्ल्स
 

Web Title : भारत बनाम वेस्ट इंडीज टी20 विश्व कप 2026: क्वार्टर-फाइनल का रोमांच!

Web Summary : भारत और वेस्ट इंडीज टी20 विश्व कप 2026 के क्वार्टर फाइनल में भिड़ेंगे। विजेता सेमीफाइनल में पहुंचेगा। मैच कोलकाता में है। भारत टी20 में आगे है, लेकिन विश्व कप में वेस्ट इंडीज का दबदबा है। लाइव देखें!

Web Title : India vs. West Indies T20 World Cup 2026: Quarter-final Thriller!

Web Summary : India faces West Indies in a crucial T20 World Cup 2026 quarter-final. The winner joins the semi-finalists. The match takes place in Kolkata. India leads in overall T20s, but West Indies dominates World Cup encounters. Tune in for live action!