Join us

IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

UAE च्या कॅप्टनला विश्वास बसेना, सूर्याला तो नेमकं काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 20:06 IST

Open in App

आशिया कप स्पर्धेतील UAE विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करणम्याचा निर्णय घेतला. नाणफेकीचा कौल आपल्या बाजूनं लागल्यावर सूर्यानं बॉल फर्स्ट असं म्हणत संजय मांजरेकर यांच्यासोबत संवाद साधण्यास सुरुवात केली. मॅच रेफ्रीनं या दोघांचा संवाद थांबवत नेमकं काय करायचा निर्णय घेतलाय असं विचारलं. यावर सूर्यकुमार यादवनं पुन्हा एकदा आम्ही बॉलिंग करणार हे स्पष्ट केले. बऱ्याच दिवसांनी मैदानात उतरतोय. त्यामुळे गोलंदाजीसह सुरुवात करत आहोत, असेही तो संजय मांजरेकर यांच्याशी संवाद साधताना म्हणाला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

UAE च्या कॅप्टनला विश्वास बसेना, सूर्याला म्हणाला...

नाणेफेक जिंकल्यावर भारतीय संघ पहिल्यांदा गोलंदाजी करेल, याची अपेक्षा यूएईच्या संघालाही नव्हती. बहुदा पहिल्यांदा बॅटिंग करत मोठी धावसंख्या करण्याचा डाव टीम इंडिया खेळेल, असेच त्यांना वाटत असावे. कारण कर्णधाराने ते टॉस नंतर बोलून दाखवले. सूर्या आपली निर्णय कळवून त्यामागचं कारण सांगत परत पॅव्हेलियनमध्ये जात असताना त्याने UAE चा कर्णधार मुहम्मद वसीम (Muhammad Waseem) याच्याशी हस्तांदोलन केले. त्यावेळी UAE चा कर्णधार सूर्याला बॅटिंग करायची ना... मला तर तुम्ही बॅटिंग कराल असेच वाटले होते, असा संवाद साधताना दिसून आले. 

Asia Cup Record : रोहित-अझरुद्दीन यांनी दुहेरी डाव साधला; पण MS धोनीच्या नावे आहे खास रेकॉर्ड

भारताची प्लेइंग इलेव्हन अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उप-कर्णदार), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेट किपर बॅटर), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

UAE प्लेइंग इलेव्हन

मुहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (विकेट किपर बॅटर), आसिफ खान, हर्षित कौशिक, ध्रुव पराशर, हैदर अली, मुहम्मद रोहिद खान, जुनैद सिद्दिकी, सिमरनजीत सिंग. 

 

टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपभारतीय क्रिकेट संघसंयुक्त अरब अमिरातीभारतीय क्रिकेट संघ