India vs Sri Lanka U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi 24 ball fifty : अंडर १९ आशिया कप स्पर्धेतील सेमी फायनल लढतीत भारतीय संघातील १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी याने सलग दुसरे अर्धशतक झळकावले आहे. शारजाहच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये श्रीलंकेच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना ४३.३ षटकात १७३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे या जोडीनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली.
वैभवची सलग दुसरी फिफ्टी, ६ चौकार अन् ५ षटकाराच्या मदतीने कुटल्या ६७ धावा
आयुष म्हात्रे आणि वैभव या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची दमदार भागिदारी करत टीम इंडियाला दमदार सुरुवात कून दिली. आयुष ३४ धावा करून माघारी फिरला. दुसऱ्या बाजूला वैभव सूर्यवंशी याने २४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. जपान विरुद्धच्या सामन्यानंतर आशिया कप स्पर्धेतील सलग दुसऱ्या सामन्यात त्याच्या भात्यातून अर्धशतकी खेळी आल्याचे पाहायला मिळाले. जपान विरुद्धच्या सामन्याप्रमाणेच यावेळीही तो विनिंग रन घेऊन नाबाद परतेल, असे वाटत होते. पण तो प्रवीणच्या गोलंदाजीवर फसला. त्याने ३६ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ६७ धावांची दमदार खेळी केली.