टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी घरच्या मैदानातील न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाचा विजयी सिलसिला कायम असल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या तीन सामन्यातील विजयासह टीम इंडियाने ही मालिका खिशात घातली. आता भारतीय संघ या मालिकेत पाहुण्या संघाला व्हाईट वॉश देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. इथं एक नजर टाकुयात भारत-न्यूझीलंड यांच्यातील चौथा टी-२० सामना कधी अन् कुठं रंगणार? या सामन्याचा क्रिकेट चाहत्यांना कसा आनंद घेता येईल? यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!भारत vs न्यूझीलंड चौथा टी२० सामना कधी अन् कुठं रंगणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा टी २० सामना बुधवारी, २८ जानेवारी रोजी विशाखापट्टणममधील ACA-VDCA स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सुरू होईल. ६ वाजून ३० मिनिटांनी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.
IND vs NZ: तुफानी विजय मिळवूनही टीम इंडियात होणार 'हे' मोठे बदल? स्टार खेळाडू बसणार बाहेर
विशाखापट्टणमची खेळपट्टी कशी असणार? संजू सॅमसनचं काय?
ACA-VDCA स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाचे 'धुरंधर' षटकार चौकारांची 'बरसात' कर मोठी धावसंख्या उभारतील, अशी अपेक्षा आहे. अभिषेक शर्मा, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव तिघे कमालीच्या फॉर्ममध्ये आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेआधी संजू सॅमसन आपल्या बॅटमधील धमक दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.
सामना लाईव्ह कुठे पाहता येईल?
हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाणार असून, JioHotstar वेबसाइट आणि अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
न्यूझीलंडविरुद्ध असा आहे भारतीय संघ
संजू सॅमसन (यष्टीरक्षक/फलंदाज), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग
न्यूझीलंडचा संघ
डेवॉन कॉन्वे, टिम सिफर्ट (यष्टीरक्षक/फलंदाज), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, मॅट हेन्री, ईश सोढी, जेकब डफी, जेम्स नीशम, मायकेल ब्रेसवेल, लॉकी फर्ग्युसन, झॅकरी फॉल्क्स, बेव्हॉन जेकब्स.
Web Summary : India aims for a series whitewash against New Zealand in the fourth T20. The match is in Visakhapatnam. Focus on Abhishek Sharma, Ishan Kishan, Suryakumar Yadav's form and Sanju Samson's opportunity. Live on Star Sports and JioHotstar.
Web Summary : भारत का लक्ष्य चौथे टी20 में न्यूजीलैंड के खिलाफ सीरीज में क्लीन स्वीप करना है। मैच विशाखापत्तनम में है। अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव के फॉर्म और संजू सैमसन के अवसर पर ध्यान केंद्रित है। स्टार स्पोर्ट्स और जियो हॉटस्टार पर लाइव।