Join us  

बाबुल सुप्रियो म्हणाले होते 'क्रिकेटचा हत्यारा'; हनुमा विहारीनं दोन शब्दांत दिलं भन्नाट उत्तर

सुप्रियो हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केल्याचं म्हणत केलं होतं वादग्रस्त ट्वीट

By जयदीप दाभोळकर | Published: January 13, 2021 5:48 PM

Open in App
ठळक मुद्देहनुमा विहारीच्या धीम्या गतीच्या खेळावर सुप्रियो यांनी केली होती टीकाविहारीनं क्रिकेटची हत्या केल्याचं म्हणत केलं होतं ट्वीट

स्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यानं टीम इंडिया दुसऱ्या डावात दोनशे धावाही करणार नाही, असा दावा केला होता. पण, टीम इंडियानं संघर्ष करताना त्याचा दावा फोल ठरवला सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाच्या ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया पाचव्या दिवशी शरणागती पत्करेल असा तर्क लावला गेला. पण, दुखापतग्रस्त खेळाडूंसह टीम इंडियानं संयमी खेळ केला. डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या दुखापतीसह रिषभ पंत मैदानावर उतरला आणि धावांचा पाऊस पाडला. अशातच सचिन तेंडुलकर, व्हीहीएस लक्ष्मण, आनंद महिंद्रा इतकंच काय आयसीसीनंही भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं. परंतु भारतीय जनता पक्षाचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी हनुमा विहारीच्या खेळीबद्दल वादग्रस्त ट्वीट केलं होतं.बाबुल सुप्रियो यांनी ट्वीट करताना त्याच्या नावाचा उल्लेख हनुमा बिहारी असा केला होता. यावरून त्यानं दोन शब्दात त्यांच्या ट्वीटला उत्तर देत 'हनुमा विहारी' असं म्हटलं. हनुमा विहारीनं त्यांना आपल्या नावाचं योग्य स्पेलिंग काय आहे हे लिहून सांगितलं आहे. काय म्हणाले होते सुप्रियो ?“फक्त सात धावा करण्यासाठी हनुमा विहारी १०९ चेंडूंचा सामना केला. हा अत्याचार आहे. हुनमा विहारीने भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शक्यतेलाच मारलं नाही तर त्यानं क्रिकेटची हत्याही केली. मला क्रिकेटमधलं अधिक कळत नाही हे माहित आहे," असं बाबुल सुप्रियो यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. "जर हनुमा विहारीनं पुढाकार घेऊन खराब चेंडू सीमापार धाडले असते तर कदाचित भारताला कदाचित ऐतिहासिक विजय मिळाला असता. पंतनं कोणीही अपेक्षा केली नव्हती अशी कामगिरी करून दाखवली. हनुमा विहारी हा सेट बॅट्समन होता त्यानं केवळ खराब चेंडू सीमापार धाडायला हवे होते," असंही ते म्हणाले होते.

टॅग्स :गुन्हेगारीभाजपाबाबुल सुप्रियोसोशल मीडियाभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया