Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियासाठी प्रयोग ठरला मास्टरस्ट्रोक! १७ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड चक्काचूर, असं पहिल्यांदाच घडलं

टी -२० वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत कधीच घडलं नाही ते यंदाच्या हंमात सूर्या भाऊच्या  नेतृत्वाखालील संघाने करून दाखवलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 13:01 IST

Open in App

Team India Set New World Record In T20 World Cup 2026 : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सिलसिला सुरु आहे. एवढेच नाही तर प्रत्येक सामन्यात भारतीय संघ नवे विक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने यंदाच्या हंगामात विजयाचा खणखणीत 'चौकार' मारला. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाचा हा सलग १२ वा आणि आयसीसी स्पर्धेतील सलग १७ वा विजय ठरला. या ऐतिहासिक कामगिरीशिवाय प्रयोगाच्या खेळात टीम इंडियाने नवा विश्वविक्रमही प्रस्थापित केला आहे.  टी -२० वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत कधीच घडलं नाही ते यंदाच्या हंमात सूर्या भाऊच्या  नेतृत्वाखालील संघाने करून दाखवलं आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा! 

टीम इंडियाने मोडला इंग्लंडचा वर्ल्ड रेकॉर्ड 

 सुपर ८ फेरीतील लढतीआदी नामिबिया विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने काही नवे प्रयोग आजमावले. यात वॉशिंग्टनची टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील एन्ट्री आणि सात गोलंदाजांचा वापर करण्यात आला. हा प्रयोग टीम इंडियासाठी  मास्टरस्ट्रोक ठरला. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक गोलंदाजांचा वापर करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आता भारतीय संघाच्या नावे झाला आहे.  याआधी २००९ मध्ये इंग्लंडच्या संघाने ११ गोलंदाजांचा वापर केल्याचे पाहायला मिळाले होता. 

कैसा फसाया... अभिषेक शर्माचा 'ड्युप्लिकेट' बोलवून नेदरलँड्सचा सराव अन् शून्यावर केला 'गेम'

साखळी फेरीतील ४ लढतीत टीम इंडियाकडून १२ गोलंदाजांचा वापर

टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या स्पर्धेतील यंदाच्या हंगामात भारतीय संघाकडून वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर आणि अभिषेक शर्मा यांनी गोलंदाजी केली आहे. हे आकडे टीम इंडिया यंदाच्या हंगामात अधिक भक्कम असल्याचा पुरावाच आहे. 

 सुपर-८ आधी सर्व प्रयोग करुन पाहिले आता...

भारतीय संघाने सुपर ८ मधील महत्त्वाच्या लढतीआधी परिस्थितीनुसार, कोणत्या वेळी कोणत्या गोलंदाजाचा वापर करावा याचा यशस्वी चाचपणी केली आहे. टीम इंडियाच्या ताफ्यात फिरकीसह जलदगती गोलंदाजी आणि अष्टपैलूत्व कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा भरणा आहे. हीच टीम इंडियाची ताकद आहे. त्यामुळे पुढच्या फेरीतही टीम इंडिया आपला दबदबा कायम ठेवत आणखी काही विक्रम प्रस्थापित करत ऐतिहासिक कामगिरी  करुन दाखवेल, अशी आशा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Team India's Experiment Masterstroke: Shatters 17-Year-Old World Record!

Web Summary : Team India's T20 World Cup run continues with a record-breaking 12th consecutive win and 17th ICC victory. Using 12 bowlers in the tournament, they surpassed England's record. This strategic experimentation strengthens their chances in the Super 8 stage.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघसूर्यकुमार यादवजसप्रित बुमराहमोहम्मद सिराजवरूण चक्रवर्तीकुलदीप यादवअक्षर पटेलवॉशिंग्टन सुंदरअभिषेक शर्माहार्दिक पांड्याअर्शदीप सिंगरिंकू सिंग