Asia Cup 2025 Points Table Super Super Four Race : टी-२० आशिया चषक स्पर्धेतील श्रीलंकेच्या विजयासह हाँगकाँगचा यंदाच्या स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे. दुसरीकडे सामना जिंकला असला तरी श्रीलंकेच्या संघासमोर अजूनही Super Four साठी पात्र असल्याचा टॅग लागलेला नाही. हाँगकाँग हा यंदाच्या हंगामातील स्पर्धेतून बाद होणारा दुसरा संघ ठरला. याआधी UAE च्या संघाने ओमानला पराभूत करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकला शह देताच टीम इंडियाची Super Four मधील एन्ट्री झाली पक्की
आशिया चषक स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. सलामीच्या लढतीत UAE ला एकहाती पराभूत केल्यावर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात पाकलाही सहज धोबीपछाड दिली. सलग दोन विजयासह टीम इंडिया Super Four मध्ये एन्ट्री मारणारी पहिला संघ ठरला. अन् तीन संघामध्ये अजूनही तगडी फाईट आहे.
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
... तर भारताच्या गटातून पाकिस्तानचा पत्ता कट होणार?
आशिया चषक स्पर्धेतील 'अ' गटात टीम इंडियानं सुपर फोरमधील स्थान पक्के केले असून ओमानचा संघ स्पर्धेतून आउट झालाय. या गटात UAE आणि पाकिस्तान यांच्यापैकी एक संघ सुपर फोरसाठी पात्र ठरेल. दोन्ही संघातील लढत १७ सप्टेंबरला होणार असून जर या सामन्यात UAE नं चमत्कार केला तर पाकिस्तानवर स्पर्धेतून आउट होण्याची वेळ येईल.
'अ' गटात कोण कोणत्या स्थानावर?
संघ | सामने | विजय | पराभव | बरोबरी | अनिर्णित (NR) | गुण | नेट रनरेट (NRR) |
---|---|---|---|---|---|---|---|
भारत (Q) | २ | २ | ० | ० | ० | ४ | +४.७९३ |
पाकिस्तान | २ | १ | १ | ० | ० | २ | +१.६४९ |
संयुक्त अरब अमिरात | २ | १ | १ | ० | ० | २ | -२.०३० |
ओमान (E) | २ | ० | २ | ० | ० | ० | -३.३७५ |
'ब' बांगलादेश अन् अफगाणिस्तान यांच्यातील लढत असेल लक्षवेधी
१६ सप्टेंबरला अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातत सामना रंगणार आहे. हा सामना बांगलादेशसाठी 'करो वा मरो'ची लढाई असेल. जर बांगलादेशच्या संघाने बाजी मारली तर या गटातील ट्विस्ट कायम राहिल. कारण अफगाणिस्तान साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. याउलट बांगलादेशचा संघ पराभूत झाला तर त्यांचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात येईल. अफगाणिस्तानच्या विजयासह श्रीलंकेचा संघही सुपर फोरसाठी पात्र ठरेल.
'ब' गटातून एक संघ आउट झाला, पण सुपर फोरसाठी तिघांच्यात शर्यत
संघ | सामने | विजय | पराभव | बरोबरी | अनिर्णीत (NR) | गुण | नेट रनरेट (NRR) |
---|---|---|---|---|---|---|---|
श्रीलंका | २ | २ | ० | ० | ० | ४ | +१.५४६ |
अफगाणिस्तान | १ | १ | ० | ० | ० | २ | +४.७०० |
बांगलादेश | २ | १ | १ | ० | ० | २ | -०.६५० |
हाँगकाँग (E) | ३ | ० | ३ | ० | ० | ० | -२.१५१ |