Amanjot Kaur Grabbing Laura Wolvaardt's Catch Turning Point Of IND vs SA Final Match Watch Video : नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमवर भारतीय महिला संघाने इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ५१ धावांनी पराभूत करत टीम इंडियाने पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. या सामन्यात कमालीच्या फिल्डिंगसह टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून देणाऱ्या अमनजोत कौरचा कॅच मॅचला टर्निंग पॉइंट ठरला.२९९ धावांचा बचाव करताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ पॅव्हिलियनमध्ये धाडला होता. पण जोपर्यंत लॉरा वॉल्व्हार्ड मैदानात होती तोपर्यंत मॅच दक्षिण आफ्रिकेच्या हातात होती.
४२ व्या षटकात लॉरानं एक मोठा फटका मारला. अमनजोत कौर तिचा कॅच घेण्यासाठी बॉलवर आली. चेंडू हातातून निसटल्यावर तिसऱ्या प्रयत्नात तिने अखेर हा झेल पूर्ण केला अन् भारतीय संघाच्या विजयातील मोठा अडथळा दूर झाला. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या कॅचसह मॅच फिरली होती आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी-२० चॅम्पियन झाला होता. यावेळी अमनजोत कोरच्या कॅचनं मॅच फिरली अन् तिच्या तिसऱ्या प्रयत्नातील झेलसह भारतीय महिला संघाचा तिसरा प्रयत्न यशस्वी ठरला. २००५ आणि २०१७ च्या हंगामातील फायनलमधील अपयशानंतर भारतीय महिला संघाने पहिली ट्रॉफी जिंकली.