Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND W vs SL W 1st T20I Live Streaming : भारत-श्रीलंका यांच्यात पहिला टी-२० सामना! स्मृतीवर असतील नजरा

भारत-श्रीलंका महिला संघातील पहिला टी-२० सामना कधी आणि कुठे रंगणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 16:56 IST

Open in App

IND W vs SL W Live Streaming : वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय महिला संघ आता आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या तयारीला लागला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ घरच्या मैदानातील श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतून पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीची सुरुवात करणार आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर पहिला आंतरारष्ट्रीय सामना, स्मृतीवर असतील नजरा

वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या वहिल्या जेतेपदानंतर भारतीय महिला संघ पहिल्यांदाच आंतरारष्ट्रीय सामना खेळणार आहे. या सामन्यात स्मृती मानधनावर सर्वांच्या नजरा असतील. कारण वैयक्तिक आयुष्यातील वादळानंतर ती मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. इथं एक नजर टाकुयात कुठे आणि कधी रंगणार भारत-श्रीलंका यांच्यातील महिला टी-२० मालिकेतील पहिला सामना? हा सामना कुठं आणि कसा पाहता येईल यासंदर्भातील सविस्तर माहिती

टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS

भारत-श्रीलंका महिला संघातील पहिला टी-२० सामना कधी आणि कुठे रंगणार?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणमच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. रविवारी २१ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. अर्धा तास आधी दोन्ही संघातील कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.

थेट प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

भारत-श्रीलंका महिला संघातील सामन्याचे थेट प्रेक्षपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरुन करण्यात येणार आहे. याशिवाय जिओ हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

स्मृती, जेमिमान हरमनप्रीतसह नवे चेहरेही ठरतील लक्षवेधीभारतीय संघात कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रोड्रिग्ज, दीप्ती शर्मा आणि रेणुका सिंग ही अनुभवी आणि ओळखीची चेहरे आहेत. याशिवाय या मालिकेत भारतीय संघात काही नव्या चेहऱ्यांची एन्ट्रीही झाली आहे. युवा फलंदाज जी. कमलिनी आणि डावखुरी फिरकीपटू वैष्णवी शर्मा यांना या मालिकेतून पदार्पणाची संधी मिळू शकते.  

English
हिंदी सारांश
Web Title : IND W vs SL W 1st T20I: India eyes World Cup prep

Web Summary : India Women face Sri Lanka in the first T20I, starting World Cup preparations. Smriti Mandhana's performance will be key. The match is in Visakhapatnam, broadcast on Star Sports and Jio Hotstar. New faces may debut.
टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघभारत विरुद्ध श्रीलंकाभारतीय क्रिकेट संघस्मृती मानधनाजेमिमा रॉड्रिग्जहरनमप्रीत कौर