कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'

England Women vs India Women, 3rd ODI टीम इंडियाने पाचव्यांदा परदेशात टी-२० सह वनडे मालिकाही जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 03:35 IST2025-07-23T03:16:44+5:302025-07-23T03:35:31+5:30

whatsapp join usJoin us
IND W vs ENG W 3rd ODI Harmanpreet Kaur Century Kranti six-wicket haul power India to series win against England | कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'

कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India To Series Win Against England : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने टी-२० मालिकेनंतर इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही ३-१ अशी जिंकली आहे. चेस्टर ली स्ट्रीट येथील रिव्हरसाईड मैदानात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात यजमान इंग्लंड महिला संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या शतकासह जेमिमा रॉड्रिग्जनं केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने निर्धारित ५० षटकात ३१८ धावा करत इंग्लंडसमोर ३१९ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना क्रांती गौड हिने घेतलेल्या ६ विकेट्सच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाचाला ४९.५ षटकात ३०५ धावांवर रोखत हा सामना १३ धावांनी जिंकत मालिकेवर कब्जा केला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

स्मृती-हरलीनच्या खेळीनंतर घोंगावलं हरमनप्रीत अन् जेमिमा नावाचं वादळ

भारतीय संघाची उप कर्णधार आणि सलामीची बॅटर स्मृती मानधना हिने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या हरलीन देओलनंही आपल्या फलंदाजीची धमक दाखवली. दोघांनी प्रत्येकी ४५-४५ धावांचे योगदान दिले. त्यानंतर निर्णायक सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर १०२ (८४) आणि जेमिमा रॉड्रिग्ज ५० (४५) जोडीनं चौथ्या विकेटसाठी ७७ चेंडूत ११० धावांची खेळी करत इंग्लंडच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. रिचा घोषनं १८ चेंडूत नाबाद ३८ धावांची  खेळी करत संघाच्या धावफलकावर ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३१८ धावा लावल्या होत्या .

IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'

इंग्लंड महिला संघानं जोर लावला; पण क्रांती गौडचा 'सिक्सर' भारी ठरला 


  
धावांचा पाठलाग करताना क्रांती गौड हिने इंग्लंडच्या दोन्ही सलामीच्या बॅटर्संना स्वस्तात पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. इमा लंब ६८ (८१), इंग्लंडची  कर्णधार नॅटसायव्हर  ब्रंट ९८ (१०५) सोफिया डंकली ३४ (३६) आणि ॲलिस डेव्हिडसन रिचर्ड्स ४४ (३२) यांनी जोर लावला. पण शेवटी इंग्लंडचा डाव ३०५धावांवरच आटोपला. भारताकडून क्रांती गौड हिने ५८ धावा खर्च करताना  सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. याशिवाय श्री चरणी हिने २ तर दीप्तीनं एक विकेट आपल्या खात्यात जमा केली. क्रांती ही पाच विकेट्सचा डाव साधणारी भारताची दुसरी युवा गोलंदाज ठरली आहे. तिने १८ वर्षे १७९ दिवस वय असताना हा पराक्रम करून दाखवला. या आधी  दीप्ती शर्मानंही एवढेच वय असताना अशी कामगिरी करून दाखवली होती.

टीम इंडियाने पाचव्यांदा परदेशात टी-२० सह वनडे मालिकाही जिंकली

  • २०१८ मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (वनडे २-१ आणि टी-२० मालिका ३-१) 
  • २०१८ मध्ये भारत विरुद्ध श्रीलंका (वनडे ३-१ आणि टी-२ मालिका ३-१)
  • २०१९ मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (वनडे २-१ आणि टी-२० मालिका ४-०)
  • २०२२ मध्ये भारत विरुद्ध श्रीलंका (वनडे ३-० आणि टी-२० मालिका २-१) 
  • २०२५ मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड (वनडे ३-१ आणि टी-२० मालिका ३-२)

Web Title: IND W vs ENG W 3rd ODI Harmanpreet Kaur Century Kranti six-wicket haul power India to series win against England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.