IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?

इथं नजर टाकुयात कधी अन् कुठं रंगणार हा सामना? कसा आहे दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड आणि Live Streaming संदर्भातील सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 08:21 IST2025-10-26T08:16:50+5:302025-10-26T08:21:28+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND W vs BAN W ICC Women's World Cup 2025 Live Streaming When And Where To Watch India Women vs Bangladesh Women Live Match In India Both Team Head To Head Record | IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?

IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?

IND W vs BAN W ICC Women's World Cup 2025 Live Streaming When And Where To Watch Live Match : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील शेवटचा (२८ वा) सामना भारत आणि बांगलादेश महिला संघामध्ये खेळवण्यात येणार आहे. रविवार, २६ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीच्या स्टेडियमवर ही लढत होईल.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या सामन्यापूर्वीच सेमीफायनलसाठी पात्र ठरली आहे. त्यामुळे ही लढत भारतासाठी “परफेक्ट प्रॅक्टिस मॅच” ठरणार आहे, कारण सेमीफायनलदेखील याच मैदानावर खेळवली जाणार आहे. दुसरीकडे, बांगलादेश महिला संघाने सहा पैकी फक्त एकच सामना जिंकला असून, स्पर्धेचा शेवट सकारात्मक निकालासह करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.  इथं नजर टाकुयात कधी अन् कुठं रंगणार हा सामना? कसा आहे दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड आणि Live Streaming संदर्भातील सविस्तर माहिती

ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल

कुठं आणि कधी रंगणार भारत-बांगलादेश महिला संघातील सामना? (Match Details)

 

  • स्पर्धा: ICC महिला वनडे वर्ल्ड कप २०२५
  • सामना: भारत महिला विरुद्ध बांगलादेश महिला
  • सामन्याची तारीख: २६ ऑक्टोबर २०२५
  • सामन्याचे ठिकाण : डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियम, नवी मुंबई
  • वेळ: दुपारी ३:०० (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
  • नाणेफेक : दुपारी २:३० वाजता

 

IND W vs BAN W सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहाल?

  • मोबाइल - हा सामना JioHotstar ॲप आणि वेबसाईटवर थेट पाहता येईल.
  • टीव्हीवर: सामना Star Sports Network वर थेट प्रसारित केला जाईल.
     

भारत विरुद्ध बांगलादेश महिला संघातील वनडेतील हेड टू हेड रेकॉर्ड

  • दोन्ही संघातील एकूण सामने - ८
  • भारत- ६ विजय
  • बांगलादेश- १ विजय
  • अनिर्णित राहिलेला सामना - १
     

IND W vs BAN W यांच्यातील वनडे वल्ड कप स्पर्धेतील रेकॉर्ड

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघात एकमेव सामना खेळवण्यात आला आहे. यात भारतीय संघाने बाजी मारली आहे.

 हवामानाचा अंदाज (Weather Forecast)

नवी मुंबईत सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. या सामन्यात पावसाची सुमारे ५० टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Web Title : भारत महिला बनाम बांग्लादेश महिला: लाइव कहां और कैसे देखें?

Web Summary : भारत महिला टीम नवी मुंबई में बांग्लादेश महिला टीम से विश्व कप का अंतिम मैच खेलेगी। भारत, पहले ही क्वालीफाई कर चुका है, अभ्यास का लक्ष्य रखता है; बांग्लादेश सकारात्मक अंत चाहता है। जियो हॉटस्टार और स्टार स्पोर्ट्स पर लाइव देखें। बारिश की आशंका है।

Web Title : India Women vs Bangladesh Women: Where and How to Watch Live?

Web Summary : India Women face Bangladesh Women in their final World Cup match in Navi Mumbai. India, already qualified, aims for practice; Bangladesh seeks a positive end. Watch live on JioHotstar and Star Sports. Rain is expected.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.