१४ चेंडूंत ६४ धावा! सूर्यकुमार यादवचे शतक थोडक्यात हुकले, पण त्याने बाबर आजमला झुकवले 

India vs West Indies 3rd T20I Live Updates : भारताची २ बाद ३४ अशी अवस्था असताना  सूर्यकुमार यादव मैदानावर वादळ घेऊन आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 11:01 PM2023-08-08T23:01:49+5:302023-08-08T23:03:47+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 3rd T20I Marathi Live : Suryakumar Yadav played just 51 matches and already the 4th highest run getter for India, he scored 83 runs from just 44 balls with 10 fours & 4 sixes   | १४ चेंडूंत ६४ धावा! सूर्यकुमार यादवचे शतक थोडक्यात हुकले, पण त्याने बाबर आजमला झुकवले 

१४ चेंडूंत ६४ धावा! सूर्यकुमार यादवचे शतक थोडक्यात हुकले, पण त्याने बाबर आजमला झुकवले 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 3rd T20I Live Updates : भारताची २ बाद ३४ अशी अवस्था असताना  सूर्यकुमार यादव मैदानावर वादळ घेऊन आला. त्याने चौकार-षटकारांची आतषबाजी करून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले आहे. तिलक वर्मासह त्याने ५१ चेंडूंत ८७ धावांची भागीदारी केली. सूर्याचे शतक थोडक्यात हुकले, परंतु आज त्याने भल्या भल्या फलंदाजांना गप्प केले.

सूर्यकुमार यादवचे २३ चेंडूंत अर्धशतक, पण ठोकली विक्रमी सेन्चुरी; मोडला ख्रिस गेलचा विक्रम 


यशस्वी जैस्वाल ( १) व  शुबमन गिल ( ४) अपयशी ठरले. सूर्यकुमार यादव आणि  तिलक वर्मा यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करून इरादे स्पष्ट केले. सूर्या वादळी खेळी करतोय हे पाहून तिलक संयमी खेळ करताना दिसला. सूर्यकुमारने २३ चेंडूंत त्याचे १४ वे अर्धशतक पूर्ण केले. वरूणराजा गरजत असताना सूर्या मैदानावर चांगली फटकेबाजी करत होता. सूर्यकुमारने आज ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडला. आज त्याने ट्वेंटी-२०त षटकारांचे शतक पूर्ण केलं अन् त्याने १००७ चेंडूंत हे शतक झळकावत ख्रिस गेलचा ( १०७१ चेंडू) विक्रम मोडला. ट्वेंटी-२०त सर्वात जलद १०० षटकार खेचणाऱ्या फलंदाजांमध्ये एविन लुईस ( ७८९) व कॉलिन मुनरो ( ९६३) हे पुढे आहेत. 


सूर्यकुमार आज शतक झळकावेल असे वाटत असताना अल्झारी जोसेफने ही विकेट मिळवली. सूर्या ४४ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह ८३ धावांवर माघारी परतला. भारताकडून सर्वाधिक ट्वेंटी-२० धावा करणाऱ्या फलंदाजांत सूर्याने शिखर धवनला मागे टाकून चौथे स्थान पटकावले आहे. सूर्याच्या पदार्पणानंतर ट्वेंटी-२० सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात बाबर आजमला ( १७५५) त्याने मागे टाकले. 

सूर्याची ट्वेंटी-२० मधील कामगिरी 
धावा - १७८०
चेंडू - १०२१
सरासरी - ४५.६४
शतक - ३
अर्धशतक - १४ 
षटकार - १०१
चौकार - १६२

Web Title: IND vs WI 3rd T20I Marathi Live : Suryakumar Yadav played just 51 matches and already the 4th highest run getter for India, he scored 83 runs from just 44 balls with 10 fours & 4 sixes  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.