सूर्यकुमार यादवचे २३ चेंडूंत अर्धशतक, पण ठोकली विक्रमी सेन्चुरी; मोडला ख्रिस गेलचा विक्रम 

India vs West Indies 3rd T20I Live Updates : यशस्वी जैस्वालचे ट्वेंटी-२० पदार्पण काही खास राहिले नाही आणि तो १ धावा करून माघारी परतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 10:44 PM2023-08-08T22:44:28+5:302023-08-08T22:44:51+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 3rd T20I Marathi Live : Suryakumar Yadav scores fifty in 23 balls, he completes completed 100 sixes from just 1007 balls in T20I, break Chris Gayle record  | सूर्यकुमार यादवचे २३ चेंडूंत अर्धशतक, पण ठोकली विक्रमी सेन्चुरी; मोडला ख्रिस गेलचा विक्रम 

सूर्यकुमार यादवचे २३ चेंडूंत अर्धशतक, पण ठोकली विक्रमी सेन्चुरी; मोडला ख्रिस गेलचा विक्रम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 3rd T20I Live Updates : यशस्वी जैस्वालचे ट्वेंटी-२० पदार्पण काही खास राहिले नाही आणि तो १ धावा करून माघारी परतला. शुबमन गिल ( ६) याच्यासाठी विंडीज दौरा काही खास राहिलेला नाही. पण, सूर्यकुमार यादवने ( Suryakumar yadav) आज सामना गाजवला अन् २३ चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याने युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडला. 


भारताच्या गोलंदाजांनी आज चांगला मारा केला. दुसऱ्या ट्वेंटी-२०त दुखापतीमुळे मुकलेल्या कुलदीप यादवने आज कमाल केली. त्याने वेस्ट इंडिजच्या ३ फलंदाजांना बाद करून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वात जलद ५०+ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत दुसरे स्थान पटकावले, तर भारताकडून ट्वेंटी-२०त ५०+ विकेट्स घेणारा तो वेगवान गोलंदाज ठरला. अक्षर पटेलने पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर कुलदीपने एकाच षटकात विंडीजच्या निकोलस पूरन ( २०) आणि ब्रेंडन किंग ( ४२) या दोन सेट फलंदाजांना माघारी पाठवले. पण, रोव्हमन पॉवेलने अखेरच्या षटकांत वादळी खेळी केली. त्याने  अर्शदीपने टाकलेल्या १९व्या षटकात पॉवेलने १७ धावा चोपल्या आणि मुकेशच्या शेवटच्या षटकात ११ धावा काढल्या. विंडीजने ५ बाद १५९ धावा केल्या. पॉवेल १९ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ४० धावा केल्या. 


इशान किशनच्या जागी आज संघात पदार्पण करणारा यशस्वी जैस्वाल ( १) आयपीएल स्टाईल खेळायला गेला अन् पहिल्याच षटकात त्याने मारलेला उत्तुंग चेंडू अल्झारी जोसेफने सहज टिपला. वन डाऊन आलेल्या सूर्यकुमार यादवने ४,६ ने त्याच्या खेळीची सुरुवात केली. शुबमन गिल ( ४) पुन्हा अपयशी ठरला अन् जोसेफने त्याची विकेट घेतली. फॉर्मात असलेल्या तिलक वर्माने सलग दोन चौकार खेचून मनसूबे स्पष्ट केले. सूर्या आज भलत्याच फॉर्मात दिसला अन् त्याच्या बॅटीतून चौकार-षटकार सहजतेनं येताना दिसले. ( यशस्वीची विकेट Video )  


सूर्यकुमारने २३ चेंडूंत त्याचे १४ वे अर्धशतक पूर्ण केले. वरूणराजा गरजत असताना सूर्या मैदानावर चांगली फटकेबाजी करत होता. सूर्यकुमारने आज ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडला. आज त्याने ट्वेंटी-२०त षटकारांचे शतक पूर्ण केलं अन् त्याने १००७ चेंडूंत हे शतक झळकावत ख्रिस गेलचा ( १०७१ चेंडू) विक्रम मोडला. ट्वेंटी-२०त सर्वात जलद १०० षटकार खेचणाऱ्या फलंदाजांमध्ये एविन लुईस ( ७८९) व कॉलिन मुनरो ( ९६३) हे पुढे आहेत. सूर्याच्या पदार्पणानंतर ट्वेंटी-२० सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात बाबर आजमनला ( १७५५) त्याने मागे टाकले. 

Web Title: IND vs WI 3rd T20I Marathi Live : Suryakumar Yadav scores fifty in 23 balls, he completes completed 100 sixes from just 1007 balls in T20I, break Chris Gayle record 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.