Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SA : ...तर करुण नायरसह तिघांपैकी एकाला मिळू शकते टीम इंडियात ‘वाइल्ड कार्ड एन्ट्री’

इथं जाणून घेऊयात कोण आहेत ते खेळाडू जे शुभमन गिलच्या जागी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:03 IST

Open in App

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल कोलकाता कसोटी सामन्यात मानेच्या दुखापतीमुळे ३ चेंडू खेळून रिटायर्ड हर्ट झाला. या दुखापतीमुळे दुसऱ्या डावातही तो बॅटिंगला उतरला नाही. गुवाहटीच्या मैदानात रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याला तो मुकण्याची शक्यता आहे. जर तो उपलब्ध नसेल तर सध्याच्या संघात त्याच्या बदली खेळाडूच्या रुपात दोन पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान न मिळालेल्या तीन चेहऱ्यांपैकी एकाला संघात वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्याचा पर्यायही खुला असेल.  इथं जाणून घेऊयात कोण आहेत ते खेळाडू जे शुभमन गिलच्या जागी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

साई सुदर्शन

शुभमन गिल दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला तर त्याच्या जागी साई सुदर्शनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. पहिल्या कसोटी सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला त्याच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर पसंती देण्यात आली होती. सुंदरनं चांगली कामगिरी केली असली तरी हा प्रयोग फसवा आणि टीम इंडियातील अस्थिरता दाखवणारा होता. कदाचित त्यामुळेच शुभमन गिल उपलब्ध असला तरी साई सुदर्शन प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची शक्यता अधिक आहे.

IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला

देवदत्त पडिक्कलचाही पर्याय

देवदत्त पडिक्कलही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी संघाचा भाग आहे. इंग्लंडविरुद्ध पदार्पणानंतर त्याला संघाकडून सातत्यपूर्ण संधी मिळालेली नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने कमालीची कामगिरी केली आहे. त्याच्या रुपात एक पर्याय टीम इंडियाकडे उपलब्ध आहे.

सरफराज खान

साई सुदर्शन आणि पडिक्कल दोघेही डावखुरे फलंदाज आहेत. जर गिलच्या जागी बदली खेळाडूच्या रुपात उजव्या हाताच्या फलंदाजाला खेळवण्याचा विचार संघ व्यवस्थापनाने केला तर संघाबाहेर असलेल्या तीन चेहऱ्यांचा विचार केला जाऊ शकतो. यात सरफराज खानचाही समावेश आहे. सरफराज खानचा देशांतर्गत क्रिकेटमधील रेकॉर्ड कमालीचा आहे. तो सध्या फॉर्ममध्येही आहे. त्यामुळे तो शुभमनग गिलच्या जागी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. 

करुण नायरला आणखी एक संधी मिळणार?

देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीनंतर करुण नायरला इंग्लंड दौऱ्यावरील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत संधी मिळाली. पण परदेशी मैदानात तो आपल्या फलंदाजीतील धमक दाखवण्यात कमी पडला. हा दौरा होताच त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. रणजी सामन्यात कर्नाटक विरुद्धच्या सामन्यात करुण नायरनं पहिल्या डावात ९५ धावांची लक्षवेधी खेळी केल्याचे पाहायला मिळाले. मोक्याच्या क्षणी भारतीय संघ त्याच्या अनुभवाचा वापर करण्याला पसंती देणार का? ते पाहण्याजोगे असेल.

ऋतुराज गायकवाडच्या रुपात आणखी एक तगडा पर्याय

ऋतुराज गायकवाड हा वनडे आणि टी-२० मध्ये सलामीच्या बॅटरच्या रुपात खेळतो. पण रेड बॉल क्रिकेटमध्ये तो चौथ्या क्रमांकावर खेळताना पाहायला मिळते. ऋतुराज गायकवाड हा देखील सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून तांत्रिकृष्ट्या सक्षम  असलेल्या या गड्याचाही पर्याय टीम इंडियाकडे असेल. ऋतुराज आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळलेला नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Who replaces Shubman Gill? Options for India's Test squad.

Web Summary : With Shubman Gill's injury, India considers replacements for the second Test. Sai Sudharsan, Devdutt Padikkal, Sarfaraz Khan, Karun Nair, and Ruturaj Gaikwad are potential options. Selectors may favor experience or domestic form.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशुभमन गिलसर्फराज खानऋतुराज गायकवाडभारतीय क्रिकेट संघ