भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मालिकेसाठी रिंकू सिंहला संघातून वगळण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेसाठी जो संघ निवडण्यात आला आहे तोच संघ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही दिसेल असे मानले जात आहे. अर्थात रिंकू सिंह फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून नव्हे तर टी-२० वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. रिंकू सिंहला पसंती देण्याऐवजी भारतीय संघाचा कर्णधार आणि संघ व्यवस्थापन अष्टपैलू खेळाडूंना पसंती देत आहे. रिंकूची कमी भरून काढण्याचा पर्यायही टीम इंडियाकडे आहे, खुद्द कर्णधार सूर्यकुमार यादवनेच ही गोष्ट बोलून दाखवली. इथं जाणून घेऊयात रिंकू सिंहला बाहेर काढून टीम इंडियात शिजलेल्या खास प्लॅनसंदर्भातील गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रिंकू सिंह संघात का नाही? कारण...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होण्याआधी भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्याला फिनिशरच्या रुपात रिंकू सिंह टीम इंडियात का नाही? असा प्रश्न विचारण्यात आला होता. शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या हे दोन अष्टपैलू खेळाडू संघात आहेत. त्यांची तुलना फिनिशरशी होऊ शकत नाही. सलामीवीरांची जबाबदारी सोडली तर संघातील सर्व खेळाडू ३ ते ७ अशा कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करु शकतात. तिलक वर्माला तुम्ही सहाव्या क्रमांकावर खेळताना पाहू शकता, असे उत्तर देत रिंकूशिवाय संघ बांधणीवर समाधानी आहे, असे सूर्यकुमार यादव म्हणाला आहे. कर्णधाराच्या हे वक्तव्य टीम इंडियाला आता रिंकू सारख्या फिनिशरची गरज उरलेली नाही, असेच आहे.
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
टी-२० तही फिनिशरच्या रुपातील स्पेशलिस्टपेक्षा ऑलराउंडरवर भरवसा
रिंकू सिंह हा सातत्याने दमदार कामगिरी करताना पाहायला मिळाले आहे. टी-२० आशिया कप स्पर्धेतही तो संघासोबत होता. पण त्याला थेट फायनलला संधी मिळाली होती. हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्यावर रिंकूला संधी मिळाली. तो एक चेंडू खेळला आणि त्या चेंडूवर त्याने संघाचा विजय निश्चित केला. पण हार्दिक पांड्याचे कमबॅक होताच त्याचा संघातील पत्ता कट झाला आहे. संघ व्यवस्थानापनाचा अष्टपैलू खेळाडूंवरील भरवशामुळे टी-२० संघातील फिनिशरच्या रुपातील स्पेशलिस्टचा पत्ताही कट झाल्याचे दिसते. याआधी कसोटी संघात अष्टपैलूंच्या भरण्यामुळे स्पेशलिस्ट फलंदाज आणि गोलंदाजांकडे दुर्लक्ष झाले होते. हाच खेळ आता टी-२० संघाची बांधणी करतानाही दिसून येत आहे.