IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला

...तर सामन्याचा निकाल भारतीय संघाच्या बाजूनं लागला असता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 19:54 IST2025-11-17T19:34:17+5:302025-11-17T19:54:46+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND VS SA Sab darr ke khel rahe hain Former India batter Mohammed Kaif claims insecurity within Test team under Gautam Gambhir | IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला

IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला

Mohammed Kaif Says Insecurity Within Test Team Under Gautam Gambhir : कोलकाताच्या येथील ईडन गार्डन्सच्या मैदानातील पराभवानंतर भारतीय संघ व्यवस्थापनावर चौहूबाजूनं टीका होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने टीम इंडियातून वगळण्यात आलेल्या सरफराज खानसह संघात असून बाकावर बसवण्यात आलेल्या साई सुदर्शनचा दाखला देत गौतम गंभीर याच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

संघातील खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना, कैफ थेट गंभीर मुद्द्यावरच बोलला

कोच गंभीरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघातील खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, संघातील आपले स्थान सुनिश्चित नसल्यामुळे खेळाडू घाबरून खेळत आहेत, त्याचा टीम इंडियाला फटका बसला आहे, अस मत मांडत  मोहम्मद कैफनं थेट गौतम गंभीरवर निशाणा साधल्याचे दिसते. 

"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं

...तर सामन्याचा निकाल भारतीय संघाच्या  बाजूनं लागला असता

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात वॉशिंग्टन सुंदरनं फलंदाजीत धमक दाखवली. पण साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर असता आणि वॉशिंग्टन सुंदरला चौथ्या क्रमांकावर बढती दिली असती तर सामन्याचा कौल हा भारताच्या बाजूनं लागला असता. भारतीय संघात प्रत्येक सामन्यात बॅटिंग ऑर्डरसह प्लेइंग इलेव्हनमध्ये बदलाचा प्रयोग पाहायला मिळत आहे. त्यामुळे खेळाडूंचा स्वत:वरील विश्वास कमी झाला आहे. त्याचा संघाच्या कामगिरीवर परिणाम दिसून येत आहे, असे मत मांडत कैफनं गंभीर मुद्द्याला हात घातला आहे.

संघातील स्थानाबद्दलची अनिश्चिततेमुळे फलंदाज फिरकीसमोर अपयशी
 
आपल्या युट्यूब चॅनेलवरील व्हिडिओमध्ये सरफराज खानचे उदाहरण देत कैफ म्हणाला की, शतक करुन त्याचे संघातील स्थान पक्के नाही. साई सुदर्शन याने ८७ धावांची खेळी केली होती. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येच घेतले नाही. हा प्रकार संघात प्रचंड गोंधळाचे वातावरण असल्याचे दाखवून देतो. संघातील अनिश्चिततेमुळेच फलंदाज फिरकीचं आव्हान झेलण्यात असमर्थ ठरत आहेत, असे ठाम मत त्याने मांडले आहे.

Web Title : IND vs SA: खिलाड़ी डरे हुए! कैफ ने गंभीर मुद्दा उठाया।

Web Summary : मोहम्मद कैफ ने भारत की हार के बाद टीम प्रबंधन की आलोचना की, टीम चयन में अनिश्चितता के कारण खिलाड़ियों में असुरक्षा का हवाला दिया। उन्होंने सरफराज खान के बहिष्कार और साई सुदर्शन को बेंच पर बिठाने की ओर इशारा करते हुए सुझाव दिया कि आत्मविश्वास की कमी प्रदर्शन को प्रभावित कर रही है।

Web Title : IND vs SA: Players are scared! Kaif raises serious issue.

Web Summary : Mohammad Kaif criticizes team management after India's loss, citing insecurity among players due to inconsistent team selection. He points to Sarfaraz Khan's exclusion and Sai Sudharsan's benching, suggesting a lack of confidence is impacting performance and batting order changes are hurting the team.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.