दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऋतुराज गायकवाडनं आपल्या फलंदाजीतील धमक दाखवून दिली. पहिल्या डावात अवघ्या १४ धावांवर बाद झालेल्या उजव्या हाताच्या युवा आणि सलामीवीरानं चौथ्या क्रमांकावर खेळताना वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. क्षमता असूनही सलामीच्या रुपात टीम इंडियातील स्लॉट रिकामा नसल्यामुळे त्याला संघात संधी मिळत नव्हती. चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याने मध्य फळीतही चमकदार कामगिरी करण्यासाठी सक्षम असल्याचे दाखवून दिले आहे. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला ही जागा मिळाली आहे. पण तो परत आल्यावर ऋतुराजचं काय होणार? असा प्रश्नही त्याच्या दमदार खेळीनंतर चर्चेचा विषय ठरतोय. यावर भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विन याने आपले मत मांडले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काही सिद्ध करण्याची गरज नाही...
अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाला आहे की, ऋतुराज हा एक सलामीवीर आहे. काहींना वाटते की, त्याने चौथ्या क्रमांकावर खेळू नये. IPL मध्ये सर्वोत्तम फलंदाज आघाडीच्या तीन क्रमांकावर असतात. पण वनडेत ऋतुराज चौथ्या क्रमांकासाठी एक सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो. तो सीमर्सना चांगले हॅण्डल करतो. इन स्विंग आउट स्विंग चेंडू खेळताना तो संघर्ष करताना दिसते. चौथ्या क्रमांकावर त्याला या गोष्टीचा सामना करावा लागणार नाही. फिरकीसमोर तो उत्तम खेळतो. विकेटदरम्यान फार वेगाने धावतो. त्याच्याकडे सर्व प्रकारचे फटके आहेत. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी त्याला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही.” असे मत आर. अश्विन याने मांडले आहे.
विराट कोहलीला तब्बल ७ वर्षानी पुन्हा 'ती' कामगिरी करायची संधी, इतिहासाची पुनरावृत्ती होणार?
श्रेयस अय्यर संघात परतल्यावर ऋतुराजच काय होणार?
अश्विन पुढे म्हणाला आहे की, श्रेयस अय्यर संघात परतल्यावरही ऋतुराज गायकवाडला वनडे संघातून संधी मिळायला हव्यात. आता या परिस्थितीत त्याला नेमकं कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हा प्रश्न नक्कीच निर्माण होईल. पण तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असला पाहिजे. तो त्याचा हक्कदार आहे.
अय्यर फिट झाला की, तो संघात परतणार हे फिक्स, कारण...
ऑस्ट्रेलिया दौर्यावरील एकदिवसीय मालिकेत श्रेयस अय्यर झेल घेताना दुखापतग्रस्त झाला होता. वनडेत चौथ्या क्रमांकासाठी तो प्रबळ दावेदार आहे. रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलकडे वनडे संघाचे नेतृत्व दिल्यावर बीसीसीआयने श्रेयस अय्यरकडे वनडे संघाच्या उप कर्णधारपदाची जबाबदारी देत आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत अय्यरकडे मध्यफळीतील प्रमुख फलंदााच्या रुपात पाहत आहोत, याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तो दुखापतीमुळे संघाबाहेर असताना ऋतुराज गायकवाड दमदार कामगिरीसह छाप सोडताना दिसतोय. भारतीय संघ व्यवस्थापन त्याच्यासंदर्भात कसा विचार करणार? ते पाहण्याजोगे असेल.