IND vs SA Leave Your Ego In Dressing Room Sunil Gavaskar Tears Into Indias Test Cricket Approach : कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानातील दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. घरच्या मैदानातील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघावर टीका चौहूबाजूनं टीका होताना दिसते. या सामन्यातील चुका टाळून २२ नोव्हेंबरला भारतीय संघ गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. त्याआधी भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावसकरांनी भारतीय संघातील फलंदाजांसह संघ व्यवस्थापन आणि BCCI निवडकर्त्यांनचे कान टोचले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चुकीचा पांयडा पाडू नका, कसोटी संघबांधणीवर पुन्हा विचार करा
स्पोर्ट्सस्टारसाठी लिहिलेल्या स्तंभलेखातून गावसकरांनी कसोटी संघात चुकीचा पायंडा पाडला जात आहे, असे रोखठोक मत मांडले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सीमित ओव्हर्सच्या ऑलराउंडर्सवर अवलंबून न राहता स्पेशलिस्ट खेळाडूंवर विश्वास दाखवण्याची गरज आहे. कोलकाताच्या मैदानातील पराभवानंतर निवडकर्त्यांनी आणि प्रशिक्षक गौतम गंभीर याने कसोटी संघ बांधणीवर पुनर्विचार करावा, असे गावसकरांनी म्हटले आहे.
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
फिरकीसमोर भारतीय फलंदाज ढेपाळण्यामागचं कारणही सांगितलं
कसोटी क्रिकेटमध्ये धैर्य, संयम आणि शिस्तबद्धत खेळ अपेक्षित असतो. अहंकाराने किंवा शॉर्ट-टर्म फॉर्मच्या आधारावर निवड करणे चुकीचे आहे. ईडन गार्डन्सच्या मैदानातील पराभवामुळे फलंदाजीतील समस्या पुन्हा एकदा दिसून आली. भारतीय फलंदाज फिरकीसाठी अनुकूल असलेल्या घरच्या मैदानात संघर्ष करताना दिसले. भारताबाहेर अधिक वेळ घालवल्यावर घरच्या मैदानात जुळवून घेण्यात फलंदाज कमी पडत आहेत, यावर काम करण्याची गरज आहे, असेही गावसकरांनी म्हटले आहे.
तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!
कसोटी क्रिकेटमध्ये यश मिळवण्यासाठी खेळाडूंनी अहंकार बाजूला ठेवावा. प्रभावी मारा होत असेल तर गोलंदाजांना सन्मान देत संयमी खेळी करता यायला हवी. गोलंदाज आव्हान देत असेल तर अशा कठीण परिस्थितीत फक्त मोठे फटके मारून प्रश्न सुटणार नाही. याउलट परिस्थिती अधिकच बिकट होते. मैदानात तग धरून धावफलक हलता ठेवणे गरजेचे असते. योग्य संधीची प्रतीक्षा करा. ती संधी मिळत नाही तोपर्यंत विनम्रतेने खेळा. हीच कसोटीत यश मिळवण्याची गुरुकिल्ली आहे, अशा आशयाच्या शब्दांत गावसकरांनी फलंदाजांन उतावळेपणावर आवर घालून संयमी खेळीचा मंत्र जपण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे.
Web Summary : Sunil Gavaskar criticized India's Test approach after their loss to South Africa, advocating for specialist players over limited-overs all-rounders. He urged selectors and coach Gautam Gambhir to reconsider team composition, emphasizing patience and humility for Test success.
Web Summary : दक्षिण अफ्रीका से हार के बाद सुनील गावस्कर ने भारत के टेस्ट दृष्टिकोण की आलोचना की, सीमित ओवरों के ऑलराउंडरों पर विशेषज्ञ खिलाड़ियों की वकालत की। उन्होंने चयनकर्ताओं और कोच गौतम गंभीर से टीम संयोजन पर पुनर्विचार करने का आग्रह किया, टेस्ट सफलता के लिए धैर्य और विनम्रता पर जोर दिया।