Join us
Daily Top 2Weekly Top 5

तिच्या नखरेल अंदाजावरील गंभीरची कमेंट सगळ्यांना खटकली; पण गावसकरांना मात्र पटली! म्हणाले…

कोलकाताच्या मैदानातील खेळीपट्टीसंदर्भात लिटल मास्टर गावसकर नेमकं काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:15 IST

Open in App

IND vs SA  Eden Gardens Pitch Controversy : कोलकाता येथीलल ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवरून सध्या चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना अवघ्या अडीच दिवसांत निकाली लागला. भारताचा माजी कर्णधार आणि पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुलीनंही खेळपट्टी अपेक्षित अशी नव्हती, हे मान्य केली. पण टीम इंडियाने ही मॅच जिंकायला हवी होती, असे वक्तव्य केले. माजी कसोटीपटू पुजारासह फिरकीपटू हरभजन सिंगनंही खेळपट्टीच्या मुद्यावरुन संतप्त प्रतिक्रिया दिली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

खेळपट्टीच्या नखरेल अंदाज अन् गंभीरची आश्चरचकित करुन टाकणारी ती 'कमेंट' 

भारतीय संघाच्या पराभवानंतर खेळपट्टीचा नखरेल अंदाजावर संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याने मात्र समाधान व्यक्त केले होते. खेळपट्टी आम्हाला हवी होती, तशीच होती, पण फलंदाजांना फिरकीचा सामना करता आला नाही अशा आशयाचे वक्तव्य गंभीरनं केले होते. खेळपट्टीसंदर्भातील त्याचे वक्तव्य टीम इंडियाच्या पहिल्या कसोटीतील टीम कॉम्बिनेशनप्रमाणेच समजण्यापलिकडचे होते, असा सूर उमटू लागला. पण आता लिटल मास्टर सुनील गावसकरांनी त्याच्या मतशी सहमती दर्शवली आहे.

कोलकाताच्या मैदानातील खेळीपट्टीसंदर्भात लिटल मास्टर गावसकर नेमकं काय म्हणाले?

सुनील गावसकर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, या खेळपट्टीवर फिरकीपटूला खूपच मदत मिळाली असे नाही. उत्तम फलंदाजीसह इथं सामना पाचव्या दिवसांपर्यंत नेता आला असता. कसोटीत वनडे किंवा टी-२० प्रमाणे  तीन निर्धाव चेंडू खेळल्यावर मोठा फटका मारायचा नसतो. हाच मोह नडला, असे सांगत त्यांनी फलंदाजांना टोलाच हाणला आहे.

कुणाचा चेंडू अधिक वळला?

कोलकाता कसोटी सामन्यात भारतीय संघासमोर १२४ धावांचे लक्ष्य होते.५ विकेट्स राखून भारतीय संघाने हा सामना जिंकायला हवा होता. सामन्यानंतर बरेच लोक खेळपट्टीवर बोलत आहेत. पण मी गंभीरच्या मताशी सहमत आहे. सायमन हार्मर आणि केशव महाराज यांना किती टर्न मिळाला? जडेजा आणि अक्षर पटेलच्या गोलंदाजीवेळी तसे पाहायला मिळाले का? असा प्रश्न उपस्थितीत करत गावसकरांनी दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील मॅचविनर फिरकीपटू सायमन हार्मर याने टर्नच्या जोरावर नाही तर अचूक टप्प्यावर कमालीच्या मिश्रणासह गोलंदाजी केल्याचेही विश्लेषणही केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gavaskar backs Gambhir's pitch comment, differing from others' views.

Web Summary : Gavaskar supports Gambhir's assessment of the Kolkata pitch, disagreeing with critics. He noted South Africa's spinners extracted less turn compared to India's, attributing their success to accuracy and variation. Gavaskar criticized Indian batsmen for impatient shots, suggesting a more measured approach could have led to victory.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकागौतम गंभीरसुनील गावसकरभारतीय क्रिकेट संघहरभजन सिंगचेतेश्वर पुजारासौरभ गांगुली