IND vs SA 5th T20I Live Streaming : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि अखेरचा टी-२० सामना जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार आहे. लखनौच्या मैदानातील धुक्यामुळे पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाचे मालिका जिंकण्याचं स्वप्न संपुष्टात आले आहे. पण टीम इंडियाला अजूनही मालिका विजयाची संधी आहे. भारतीय संघाने पहिल्या तीन लढतीतील २ विजय आणि एका पराभवासह मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया मालिका विजयासह वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी जोर लावेल. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा टी-२० सामना कुठे आणि कधी रंगणार? या सामन्याचा कुठे आणि कसा पाहता येईल त्यासंदर्भातील माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कुठं आणि कधी रंगणार भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा T20I सामना?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा आणि अखेरचा टी-२० सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. १९ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार, ६ वाजून ३० मिनिटांनी नाणेफेक झाल्यावर सायंकाळी ७ वाजता सामन्यातील पहिला चेंडू फेकला जाईल.
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य
IND vs SA 5th T20I Live Live Streaming सह टेलिव्हिजनवर कसा पाहता येईल?
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० सामन्याचे थेट प्रेक्षपण हे स्टार स्पोर्ट्स चॅनेलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याशिवाय जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटच्या माध्यमातून मोबाईरवरही या सामना लाइव्ह स्ट्रिमिंगसाठी उपलब्ध असेल.
भारतीय संघ
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, शहबाज अहमद
दक्षिण आफ्रिकेचा संघ
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रिझा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), डेवॉल्ड ब्रेव्हिस, ट्रिस्टन स्टब्स, डोनोव्हन फेरेरा, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, एनरिक नॉर्खिया, लुंगी एन्गिडी, ऑटनील बार्टमन, डेव्हिड मिलर, केशव महाराज, जॉर्ज लिंडे, टोनी डी झोर्झी, लुथो सिपामला, क्वेना माफाका.