IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याच्या धमाकेदार फलंदाजीनंतर बुमराहनं मोक्याच्या क्षणी क्विंटन डीकॉकची घेतलेली विकेट आणि वरुण चक्रवर्तीनं फिरकीत दाखवलेली जादू याच्या जोरावर भारतीय संघानं अहमदाबादचं मैदान मारले. या सामन्यातील विजयासह टीम इंडियानं पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-१ अशी खिशात घातली. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून चालत आलेला मालिका विजयाचा सिलसिला वर्षाअखेर कायम राखण्यात टीम इंडिया यशस्वी ठरली. सलग ८ व्या मालिका विजयासह भारतीय संघाने घरच्या मैदानातील टी-२० वर्ल्ड कपसाठी तयार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉकची कडक फिफ्टी, पण..
भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना अभिषेक शर्मा ३४(२१) आणि संजू सॅमसन ३७ (२२) या जोडीनं संघाला दमदार सुरुवात करुन दिली. त्यानंत तिलक वर्मा ७३ (४२) आणि हार्दिक पांड्या ६३ (२५) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित २० षटकात २३१ धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर २३२ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात २०१ धावांपर्यंतच मजल मारता आली. सलामीवीर क्विंटन डी कॉनं संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. अर्धशतकी खेळीसह त्याने टीम इंडियाचे टेन्शन वाढवले होते. पण दक्षिण आफ्रिकेच्या धावफलकावर १२० धावा असताना बुमराहनं त्याची विकेट घेतली. तो तंबूत परतल्यावर वरुण चक्रवर्ती पिक्चरमध्ये आला. त्याने पुन्हा एकदा आपल्या फिरकीतील जादू दाखवून देत सामना भारताच्या बाजूनं वळवला.
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
जसप्रीत बुमराहनं महत्त्वाची विकेट घेतली अन् मग वरुण चक्रवर्तीच्या फिरकितील जादू दिसली
दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी क्विंटन डी कॉकनं ३५ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६५ धावांची खेळी केली. ११ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बुमराहनं स्वत:च्या गोलंदाजीवर त्याचा सुंदर झेल घेत टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. त्याच्याशिवाय डेवॉल्ड ब्रेविसनं १७ चेंडूत केलेली ३१ धावांची खेळी सोडली तर अन्य एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाजीसमोर निभाव लागला नाही. टी-२० तील नंबर वन गोलंदाज वरुण चक्रवर्तीनं ४ षटकात ५३ धावा खर्च केल्या. पण चार विकेट्स घेत त्याने पुन्हा एकदा भारतीय संघाला सामन्यासह मालिका विजयात मोलाचा वाटा उचलल्याचे पाहायला मिळाले.
Web Summary : India defeated South Africa, winning the T20I series 3-1. Verma and Pandya's batting, Bumrah's key wicket, and Chakravarthy's spin secured the victory, continuing India's winning streak and showcasing their World Cup readiness.
Web Summary : भारत ने दक्षिण अफ्रीका को हराया और टी20 श्रृंखला 3-1 से जीती। वर्मा और पांड्या की बल्लेबाजी, बुमराह का महत्वपूर्ण विकेट और चक्रवर्ती के स्पिन ने जीत सुनिश्चित की, जिससे भारत की जीत का सिलसिला जारी रहा और विश्व कप के लिए उनकी तैयारी का प्रदर्शन हुआ।