Join us
Daily Top 2Weekly Top 5

Suryakumar Yadav : सूर्यानं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम; असा पराक्रम करून दाखवणारा ठरला जगातील पहिला कर्णधार

आंतरारष्ट्रीय टी-२० सर्वाधिक वेळा १०० पेक्षा अधिक धावांनी सामने जिंकून देणारे कर्णधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:23 IST

Open in App

IND vs SA 1st T20I Suryakumar Yadav Set New World Record As Captain: सूर्यकुमार यादव हा फलंदाजीत धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. पण त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मात्र विजयाचा सिलसिला कायम आहे. दक्षिण आफ्रिक विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतही टीम इंडियाने मोठ्या फरकाने विजय नोंदवला. या सामन्यातील १०१ धावांच्या विजयासह सूर्यकुमार यादव टी-२० क्रिकेट जगतातील नंबर वन कर्णधार ठरला आहे. जे अन्य कोणत्याही कर्णधाराल जमले नाही ते सूर्यान करुन दाखवलं आहे. इथं एक नजर टाकुयात त्याच्या कॅप्टन्सीच्या वर्ल्ड रेकॉर्डवर

सूर्यकुमार यादवच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादव फक्त १२ धावा करुन तंबूत परतला. पण टीम इंडियाने शंभर धावांच्या अंतराने विजय नोंदवताच सूर्यकुमार यादवच्या नावे वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक  वेळा १०० पेक्षा अधिक  धावांनी विजय मिळणारा सूर्यकुमार यादव हा एकमेव कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाचव्यांदा १०० पेक्षा अधिक फरकाने सामना जिंकला आहे. आंतरारष्ट्रीय टी-२० सर्वाधिक वेळा १०० पेक्षा अधिक धावांनी सामने जिंकून देणारे कर्णधार

  • ५- सूर्यकुमार यादव
  • ३-ॲरॉन फिंच
  • २- मोहम्मद नबी
  • २- रोवमेन पॉवेल 

फलंदाजीत धावांसाठी संघर्ष संपता संपेना

सूर्यकुमार यादव टॉस वेळीच नव्हे तर फलंदाजीतही सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल स्वस्तात माघारी फिरल्यावर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला. भारातच्या डावातील तिसऱ्या षटकात त्याने १ चौकार आणि एक षटकार मारून धावांचा संघर्ष संपवण्याचे संकेत दिले. पण लुंगी एनिगडीनं १२ धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लावला. 

 या वर्षात एकही अर्धशतक नाही आलं

सूर्यकुमार यादवसाठी T20I मध्ये हे वर्ष संघर्षमयी राहिले आहे. यावर्षात त्याच्या भात्यातून एकही अर्धशतक पाहायला मिळालेले नाही. नाबाद ४७ धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. यावर्षात  १६ डावात त्याने १५.०७ च्या सरासरीसह फक्त १९६ धावा केल्या आहेत. या वर्षात T20I मध्ये कमीत कमी ५० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादवची सरासरी ही सर्वात कमी आहे.

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Suryakumar Yadav sets world record as captain in T20Is.

Web Summary : Suryakumar Yadav achieved a world record as captain, leading India to five T20I wins by over 100 runs. Despite his batting struggles, his captaincy shines. He is the first captain to achieve this feat in T20Is.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकासूर्यकुमार यादवभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ