Join us

RSA vs IND : मिशन टी-२० साठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत; इथं पाहा मजेशीर व्हिडिओ

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 11:57 IST

Open in App

IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पोहचला आहे. भारतीय संघ ८ नोव्हेंबरला या टी-२० मालिकेच्या मोहिमेला सुरुवात करेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासोबत कोचच्या रुपात व्हीव्हीएस लक्ष्मण संघासोबत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते.

टीम इंडिया डरबन येथे पोहचल्याची माहिती शेअर करताना बीसीसीआयने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या मजेदार व्हिडिओमध्ये भारतीय ताफ्यातील खेळाडू प्रतिस्पर्धी संघाला भिडण्याआधी आपल्याच सहकाऱ्यांची फिरकी घेताना पाहायला मिळत आहे. 

अभिषेक शर्मा झाला अँकर, अन्....

 टीम इंडियाचा युवा स्फोटक फलंदाज अँकरच्या रुपात अन्य खेळाडूंना जनरल नॉलेजसंदर्भातील प्रश्न विचारताना दिसते. तिलक वर्मासह अन्य खेळाडूंना त्याने दक्षिण आफ्रिकेच्या राजधानीसंदर्भातील प्रश्न विचारल्याचे पाहायला मिळते. याशिवाय अक्षर पटेलही अर्शदीपसोबत मजाक मस्तीच्या मूडमध्ये दिसला. युवा खेळाडूंशिवाय काही वरिष्ठ खेळाडूंची झलकही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रियाही उमटताना दिसून येत आहे. 

टी २० मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे टीम इंडिया

भारतीय क्रिकेट संघ टी-२० क्रिकेटमध्ये सध्या दमदार कामगिरी करताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी भारतीय संघाने घरच्या मैदानात बांगलादेशचा ३-० असा धुव्वा उडवला होता. या मालिकेत अनेक विक्रमही प्रस्थापित झाल्याचे पाहायला मिळाले होते. हाच तोरा टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेतही कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ 

 सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई , अर्शदीप सिंग, विजयकुमार, आवेश खान, यश दयाल.

दक्षिण आफ्रिकेचा संघ 

 एडेन मार्करम, ओटनील बार्टमॅन, जेराल्ड कोएत्झी , डोनोवन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जानसन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रूगर, केशव महाराज, डेविड मिलर, मिहलाली मपोंगवाना, नकाबा पीटर, रयान रिकेलटन, एंडिल सिमलेन, लूथो सिपाम्ला, ट्रिस्टन स्टब्स.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयसूर्यकुमार अशोक यादवद. आफ्रिकाटी-20 क्रिकेट