Team India Grand Welcome After Winning Asia Cup 2025 Trophy : आशिया कप स्पर्धेत दुबईचं मैदान गाजवल्यावर मायदेशात परतलेल्या टीम इंडियातील खेळाडूंचं जंगी स्वागत करण्यात आले. रविवारी झालेल्या फायनल सामन्यात पाकिस्तानला यंदाच्या हंगामात तिसऱ्यांदा पराभवाची धूळ चारत भारतीय संघाने नवव्यांदा ही स्पर्धा जिंकली. मेगा फायनलनंतर भारतीय संघातील खेळाडूंनी पाकिस्तानी मंत्री आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे संघातील खेळाडू ट्रॉफी आणि मेडलशिवायच मायदेशी परतेल आहेत. देशातील वेगवेगळ्या शहरात टीम इंडियातील खेळाडूंच अगदी थाटामाटात स्वागत करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कॅप्टनस सूर्कुमार यादवचं मुंबईत तर कोच गंभीर अन् कुलदीपचं अहमदाबादमध्ये स्वागत
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचे हार तुरे देऊन पारंपारिक मराठमोळ्या अंदाजात स्वागत करण्यात आले. . दुसरीकडे संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि फिरकीपटू कुलदीप यादव दुबईहून थेट अहमदाबाद विमानतळावर उतरले. इथंच या जोडीचं स्वागत करण्यात आले.
हार्दिक पांड्याही दुबईहून मायदेशी परतला आहे. मुंबई विमानतळावर तो स्पॉट झालाय सुरक्षा कवचात तो आपल्या अलिशान कारपर्यंत पोहचला. त्याने कडक अन् स्टायलिश लूकसह आपला स्वॅगची जादू दाखवून दिली.
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाह...
हैदराबादमध्ये तिलक वर्माची हवा
आशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्ये तिलक वर्मानं मॅच विनिंग खेळी केल्याचे पाहायला मिळाले. टीम इंडिया अडचणीत असताना त्याने आधी डाव सावरला. मग अखेरच्या षटकात ५ चेंडूत ८ धावांची गरज असताना हारिस राउफच्या गोलंदाजीवर षटकार मारत सामना भारताच्या बाजूनं सेट केला. दुबईहून घरी परतणाऱ्या स्टारची झलक पाहण्यासाठी हैदराबाद विमानतळावर चाहत्यांनी गर्दी केली होती. त्याचेही जोरदार स्वागत करण्यात आले.
टीम इंडियाच्या विजयी सिलसिला अन् वादग्रस्त घटनेची मालिका
आशिया कप स्पर्धेत भारत-पाक यांच्यातील प्रत्येक सामन्यात एक नवा वाद पाहायला मिळाला. सूर्यकुमार यादव अँण्ड कंपनीने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानी संघातील खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळला. हा मुद्दा चांगलाच गाजला. सुपर फोरमधील लढतीत भारत-पाक यांच्यातील खेळाडू मैदानात एकमेकांविरुद्ध भिडल्याचे पाहायला मिळाले. फायनल लढतही भारत-पाक यांच्यात झाली. शिया कप स्पर्धेच्या ४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच या दोन संघात जेतेपदाची लढत रंगल्याचे पाहायला मिळाले. पाकला थोबीपछाड देत टीम इंडियानं दुबईचं मैदान मारलं. पण नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास साफ नकार दिल्याचे पाहायला मिळाले.