IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

इथं एक नजर टाकुयात IND vs PAK यांच्यातील सुपर ४ मधील लढत कुठं अन् कशी पाहता येईल? कसा आहे दोन्ही संघातील T20I मधील रेकॉर्ड यासंदर्भातील सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 04:23 IST2025-09-21T03:50:30+5:302025-09-21T04:23:45+5:30

whatsapp join usJoin us
IND vs PAK Live Streaming in India When and Where to Watch Asia Cup 2025 Super Fours Match 14th Know India vs Pakistan Head To Head Record | IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs PAK Live Streaming in India When and Where to Watch Asia Cup 2025 Super Fours Match : आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुन्हा एकदा  सलमान अली आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघा विरुद्ध मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. २१ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ सुपर फोरमधील आपला पहिला सामना खेळण्यासाठी  मैदानात उतरतील.  साखळी फेरीत एकहाती विजय मिळवल्यावर आता दुसऱ्यांदा टीम इंडिया पाकचा बुक्का पाडत विजयी चौकार मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. इथं एक नजर टाकुयात IND vs PAK यांच्यातील सुपर ४ मधील लढत कुठं अन् कशी पाहता येईल? कसा आहे दोन्ही संघातील T20I मधील रेकॉर्ड यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कुठं अन् कधी रंगणार IND vs PAK यांच्यातील सामना? (When and where will the IND vs PAK match be played)

भारतीय प्रमाण वेळेनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत रात्री ८ वाजता सुरु होईल. त्याआधी ७. वाजून ३० मिनिटांनी दोन्ही संघातील कर्णधार टॉससाठी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर उतरतील. यावेळीचा माहोल कसा असणार तेही पाहण्याजोगे असेल. कारण मागच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं टॉस वेळी हस्तांदोलन न करता पाक कर्णधाराकडे पाठ फिरवली होती. हा मुद्दा चांगलाच गाजला. 

 SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता

टेलिव्हिजनवर कोणत्या चॅनेलवर घेता येईल भारत-पाक सामन्याचा आनंद? ( Asia Cup 2025 IND vs PAK Broadcasting Channel List)

भारतात आशिया कप स्पर्धेतील सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क हे सोनी नेटवर्ककडे आहेत. टेलिव्हिजनवर  भारत-पाकिस्तान यांच्यातील सुपर फोरमधील लढतीचा आनंद घ्यायचा असेल तर सोनी स्पोर्ट्स टेनच्या वेगवेगळ्या भाषेतील चॅनेलचे पर्याय उपलब्ध आहेत.

  • सोनी स्पोर्ट्स टेन १ आणि ५ (Sony Sports Ten 1/Sony Sports Ten 5) (इंग्रजी)
  • सोनी स्पोर्ट्स टेन ३ (Sony Sports Ten 3) (हिंदी)
  • सोनी स्पोर्ट्स टेन ४  (Sony Sports Ten 4) (तामिळ)


 लाईव्ह स्ट्रीमिंग (IND vs PAK Live Streaming in India?)

लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून Sony Liv अ‍ॅप आणि वेबसाइटसह फॅन कोडच्या माध्यमातून मोबाईलवर देखील भारत-पाक हायहोल्टेज लढतीचा आनंद घेता येईल. यासाठी सब्स्क्रिप्शन (सदस्यत्व) असणे गरजेचे आहे. काही मोबाईल नेटवर्क कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी खास प्लॅन ऑफर करत आहेत.  

भारत-पाक यांच्यातील T-20I मधील हेड टू हेड रेकॉर्ड

२००७ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना खेळवण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध १४ सामन्यात समोरा समोर आले आहेत. यात टीम इंडियाने ११ वेळा तर पाकिस्तानच्या संघाने फक्त ३ वेळा विजय मिळवला आहे.

भारत-पाक मॅच हायलाइट्स  (India vs Pakistan Match Highlights)

 

 

Web Title: IND vs PAK Live Streaming in India When and Where to Watch Asia Cup 2025 Super Fours Match 14th Know India vs Pakistan Head To Head Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.