Join us

Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

IND vs PAK सामन्या वेळी सामनाधिकाऱ्याच्या रुपात कोण दिसणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 18:23 IST

Open in App

Andy Pycroft Appointed Match Referee For India vs Pakistan : आशिया चषक २०२५ स्पर्धेत पुन्हा एकदा भारत-पाक यांच्यात सामना रंगणार आहे. साखळी फेरीतील लढतीनंतर आता २१ सप्टेंबरला सुपर फोरमध्ये पुन्हा हे दोन संघ आमने सामने येणार आहेत. आशिया चषक स्पर्धेतील IND vs PAK यांच्यातील पहिल्या सामन्यानंतर हस्तांदोलन प्रकरण चांगलेच गाजले. टीम इंडियाने टॉस वेळी अन् मॅचनंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं टाळलं होते. या प्रकरणात पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सामनाधिकारी अँडी पाइक्रॉफ्ट यांना यांनी भारताची बाजू घेतल्याचा आरोपही केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पुन्हा दोन्ही संघ एकमेकांना भिडणार त्यावेळी मॅच रेफरी कोण? हा मुद्दा चर्चेत आला होता. यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला असून पूर्वीचा पॅटर्न कायम ठेवण्यात आल्याचे दिसते.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

IND vs PAK सामन्या वेळी सामनाधिकाऱ्याच्या रुपात कोण दिसणार?

पीटीआयने ICC च्या सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार,  सुपर फोरमध्ये रविवारी रंगणाऱ्या भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी पुन्हा एकदा ICC एलिट पॅनलमधील अँड्री पाइक्रॉफ्ट यांचेच नाव सामनाधिकारी म्हणून निश्चित करण्यात आले आहे. IND vs PAK यांच्यातील लढती वेळी पंच आणि सामनाधिकारी कोण असतील याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी या सामन्यात पुन्हा एकदा वादग्रस्त गोष्टीमुळे चर्चेत आलेला  चेहराच दिसणार हे स्पष्ट होताना दिसतेय.  अँडी पाइक्रॉफ्ट याच्याशिवाय आशिया चषक स्पर्धेत दुसऱ्या सामनाधिकाऱ्याच्या रुपात  वेस्ट इंडिजचा दिग्गज अन् माजी कर्णधार रिची रिचर्डसन यांच्या नावाचाही समावेश आहे. 

Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

हस्तांदोलन प्रकरण अन् पाकची नौटंकी

टीम इंडियानं हस्तांदोलन न केल्यामुळे पाकनं थेट आयसीसीचा दरवाजा ठोठावला होता. सामनाधिकारी अँड्री हटवा नाहीतर आशिया कप स्पर्धेवर बहिष्कार टाकू अशी धमकीही PCB नं दिली. UAE विरुद्धच्या सामन्याआधी तासभर आपल्या आपल्यात चर्चा करून ते खेळायला तयार झाले. महत्त्वाचं म्हणजे नौटंकीनंतर तासभर उशीरा सुरु झालेल्या PAK vs UAE यांच्यातील सामन्यावेळी देखील अँडी पाइक्रॉफ्ट हेच सामनाधिकारी होते. पुन्हा भारत-पाक सामना रंगणार त्यावेळीही तेच ही भूमिका बजावताना दिसतील, असे दिसते. सगळं पहिल्यासारख सेट झाल्यावर दोन्ही संघातील खेळाडूमधील माहोल काय असेल? ते बघण्याजोगे असेल.

टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपभारत विरुद्ध पाकिस्तानसूर्यकुमार यादवभारतीय क्रिकेट संघआयसीसीबीसीसीआय