IND vs NZ T20I: श्रेयस अय्यर नव्हे, इशान किशनच पहिली पसंती! सूर्यकुमार यादवने त्यामागचं कारणही सांगितले

तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यर टीम इंडियात स्थान मिळाले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 18:31 IST2026-01-20T18:14:08+5:302026-01-20T18:31:49+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs NZ Suryakumar Yadav Confirmed Ishan Kishan Will Bat At 3 In 1st T20 Against New Zealand In Nagpur No Place Of Shreyas Iyer In India Playing 11 | IND vs NZ T20I: श्रेयस अय्यर नव्हे, इशान किशनच पहिली पसंती! सूर्यकुमार यादवने त्यामागचं कारणही सांगितले

IND vs NZ T20I: श्रेयस अय्यर नव्हे, इशान किशनच पहिली पसंती! सूर्यकुमार यादवने त्यामागचं कारणही सांगितले

IND vs NZ Suryakumar Yadav Confirmed Ishan Kishan Will Bat At 3 In 1st T20  :  टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ घरच्या मैदानात न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. नागपूरच्या मैदानात रंगणाऱ्या पहिल्या सामन्याआधी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने  पत्रकार परिषदेत वेगवेगळ्या मुद्यावर भाष्य केले. आपल्या फलंदाजीच्या फॉर्मसह त्याने तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार? याचेही उत्तर दिले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यर टीम इंडियात स्थान मिळाले, पण...
  
भारत-न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेसाठी तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरची टी-२० संघात वर्णी लागली आहे. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळणं कठीण आहे. पहिल्या टी-२० सामन्यात इशान किशनला पहिली पसंती दिली जाणार आहे. खुद्द सूर्यकुमार यादवनं याची पुष्टी केली आहे.

इशान किशनला पहिली पसंती का? सूर्यकुमार यादवनं सांगितलं त्यामागचं कारण 

इशान किशन हा आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या आधी तो संधीचा हक्कदार आहे, असे सूर्यकुमार यादव म्हणाला आहे. इशान किशन याने आतापर्यंत ३२ टी-२० सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनीधीत्व केले आहे. ६ अर्धशतकासह त्याच्या नावे ९३३ धावांची नोंद आहे. २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो अखेरचा टी-२० सामना खेळला होता. दोन वर्षांपेक्षा अधिक काळ टीम इंडियातून बाहेर असणाऱ्या इशान किशन याने देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरी करत पुन्हा टीम इंडियात एन्ट्री मारली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत झारखंडच्या संघाला ऐतिहासीक जेतेपद मिळवून दिल्यावर त्याची टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात निवड झाली होती. 

IND vs NZ T20I : शंभर टक्के ‘सेंच्युरी’! सूर्या दादा थेट विराट–रोहितच्या खास पंक्तीत सामील होणार

अचानक टीम इंडियात एन्ट्री आता प्लेइंग इलेव्हनमधील स्थानही पक्के

इशान किशन हा दुसर्या विकेट किपर बॅटरच्या रुपात टी-२० वर्ल्ड कपसह न्यूझीलंड संघाचा भाग आहे. विकेट किपर बॅटरच्या रुपात संजू सॅमसन आणि ईशान किशन असे दोन पर्याय टीम इंडियाकडे आहेत. पण न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ या दोघांसह मैदानात उतरणार असल्याचे दिसते. संजू सॅमसन अभिषेक शर्मासोबत डावाला सुरुवात करेल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज इशान किशन बॅटरच्या रुपात मध्यफळीतील जबाबदारी सांभाळताना दिसेल. ही मालिका गाजवून त्याला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्लेइंग इलेव्हनची दावेदारी भक्कम करण्याची संधी आहे.

Web Title : श्रेयस अय्यर पर ईशान किशन को प्राथमिकता, सूर्यकुमार यादव ने बताई वजह।

Web Summary : न्यूजीलैंड के खिलाफ पहले टी20 में श्रेयस अय्यर से आगे ईशान किशन को तरजीह मिलने की संभावना है। सूर्यकुमार यादव ने आगामी टी20 विश्व कप टीम में किशन को शामिल करने को कारण बताया। किशन का हालिया घरेलू प्रदर्शन भी एक वजह है।

Web Title : Ishan Kishan preferred over Shreyas Iyer, Suryakumar Yadav reveals reason.

Web Summary : Ishan Kishan is likely to be preferred over Shreyas Iyer in the first T20I against New Zealand. Suryakumar Yadav cited Kishan's inclusion in the upcoming T20 World Cup squad as the reason. Kishan's recent domestic performance also played a role.