Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ 5th T20I Live Streaming : भारत-न्यूझीलंड सामना अन् धावांची 'बरसात'! कोण मारणार बाजी?

इथं नजर टाकुयात सामना कधी कुठं अन् कसा पाहता येईल यासंदर्भातील सविस्तर माहिती....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 14:06 IST

Open in App

IND vs NZ 5th T20I Live Streaming : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारत-न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या द्विपक्षीय टी-२० मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना शनिवारी तिरुवनंतपुरमच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-२० मधील आपला दबदबा कायम राखत पहिल्या तीन सामन्यातील विजयासह मालिका आधीच आपल्या नावे केली. पण न्यूझीलंडच्या संघाने चौथ्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात झालेल्या चुका टाळून टीम इंडिया मालिकेचा शेवट विजयासह करण्यासाठी प्रयत्नशील असेल. या सामन्यात संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का? तो चार सामन्यातील अपयश भरून काढत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या प्लेइंग इलेव्हनमधील दावेदारी ठोकणार का? तेही पाहण्याजोगे असेल. इथं नजर टाकुयात सामना कधी कुठं अन् कसा पाहता येईल यासंदर्भातील सविस्तर माहिती....

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

चौथ्या सामन्यात बदलाचा प्रयोग फसला

चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघ पाच प्रमुख गोलंदाजासह मैदानात उतरला होता. अष्टपैलू शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याने या सामन्यात एकही षटक टाकले नव्हते. पण हा प्रयोग फसवा ठरला. त्यामुळे पाचव्या सामन्यात हाच गेम प्लॅन राहणार की, टी-२० वर्ल्ड कपसाठी जी रणनिती आखली आहे त्यानुसार टीम इंडिया मैदानात उतरणार तेही पाहण्याजोगे असेल.

T20 World Cup 2026 : साखळी फेरीतील ४० सामन्यांसाठी २४ पंच! भारत-पाक सामन्यात कोण पाहणार जबाबदारी?

कधी आणि कुठं रंगणार भारत-न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टी-२० सामना?

भारत-न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा टी-२० सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमववर खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी ७ वाजता या सामन्यातील पहिला चेंडू फेकला जाईल. अर्धा तास अगोदर दोन्ही संघातील कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. 

IND vs NZ 5th T20I सामना LIVE कसा पाहता येईल?

भारत-न्यूझीलंड यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल. याशिवाय क्रिकेट चाहते जिओहॉटस्टार  अ‍ॅप आणि वेबसाईटच्या माध्यमातूनही या सामन्याचा आनंद घेऊ शकतील.

तिरुवनंतपुरम पिच रिपोर्ट

तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर नोव्हेंबर २०२३ नंतर पहिल्यांदा सामना खेळवण्यात येत आहे. या मैदानातील खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल राहिली आहे. त्यामुळे पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात धावांची 'बरसात' पाहायला मिळू शकते. ही बाजी मारत दोन्ही संघ आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी आत्मविश्वास उंचावण्यासाठी प्रयत्नशील असतील. 

 भारताचा संभाव्य संघ (India Predicted Playing XI) 

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

 न्यूझीलंडचा संभाव्य संघ  ( New Zealand Predicted Playing XI) 

डेवॉन कॉन्वे,  टिम सिफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, ईश सोढी जेकब डफी / लॉकी फर्ग्युसन.

IND vs NZ हेड-टू-हेड रेकॉर्ड

एकूण सामने: २९

भारती संघाने १७ सामने जिंकले (यात २ सुपर ओव्हर)

न्यूझीलंडच्या संघाने ११ सामने जिंकले

बरोबरी: १ 

English
हिंदी सारांश
Web Title : India vs New Zealand 5th T20I: Expect runs, who will win?

Web Summary : India faces New Zealand in the final T20I, aiming to end the series with a win. Focus is on team composition for the T20 World Cup. The match will be held in Thiruvananthapuram, promising a high-scoring affair. All eyes are on the crucial match.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघसूर्यकुमार यादवसंजू सॅमसन