IND vs NZ : "दात-ओठ खाऊन…" हार्दिक पांड्याचा सल्ला; इशान किशनचा कल्ला!

ते मी फक्त जगाला दाखवण्यासाठी केलं, इशान किशनची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 01:23 IST2026-01-24T01:17:54+5:302026-01-24T01:23:23+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs NZ 2nd T2OI Ishan Kishan Said Hardik Pandya Advice Me Hit With Teeth Clenched It Will Take That Much Force | IND vs NZ : "दात-ओठ खाऊन…" हार्दिक पांड्याचा सल्ला; इशान किशनचा कल्ला!

IND vs NZ : "दात-ओठ खाऊन…" हार्दिक पांड्याचा सल्ला; इशान किशनचा कल्ला!

Ishan Kishan On Hardik Pandya After IND vs NZ 2nd T2OI Match : भारत- न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात रायपूरच्या मैदानात इशान किशन नावाचं वादळ घोंगावलं. २०० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना अवघ्या ६ धावांवर दोन्ही सलामीवीर माघारी फिरले असताना दबाव न घेता इशान किशन याने शानदार शो दाखवला. जवळपास दोन वर्षांनी टीम इंडियात कमबॅकची संधी मिळाल्यावर पहिल्या सामन्यात तो अपयशी ठरला होता. या अपयशानंतर हार्दिक पांड्यानं युवा डावखुऱ्या बॅटरला  खास सल्ला दिला होता. खुद्द इशान किशन याने आपल्या दमदार इनिंगनंतर त्यासंदर्भातील गोष्ट शेअर केली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

"दात ओढ खाऊन मार...." इशान किशनला ऑलराउंडर हार्दिकनं दिलेला कानमंत्र
 
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात इशान किशन याने ३२ चेंडूत २३७.५० च्या स्ट्राइक रेटसह ७६ धावांची धमाकेदार खेळी केली. या खेळीचं शतकात रुपांतर करायचं होतं. पण त्यात कमी पडलो. असे तो म्हणाला. एवढेच नाही तर पहिल्या सामन्यात स्वस्तात विकेट गमावल्यावर हार्दिक पांड्यानं फलंदाजीसंदर्भात खास सल्ला दिल्याची गोष्टही त्याने शेअर केली. दात ओठ खाऊन फटका मार, म्हणजे ताकदीने चेंडू बाहेर जाईल, असा सल्ला पांड्याने दिला होता. ती गोष्ट खेळी बहरण्यात फायद्याची ठरली, असे इशान किशन याने जिओ स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

"लंचला इशानने काय खाल्लं होतं माहित नाही, मला त्याचा रागही आलेला, पण...." नेमकं काय म्हणाला सूर्या?

ते मी फक्त जगाला दाखवण्यासाठी केलं, पण...

भारतीय संघाच्या डावातील पाचव्या षटकात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर गोलंदाजी करत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्यासाठी इशान किशनने ताकदीने बॅट फिरवली. चेंडू बॅटवरही लागला. पण यावेळी बॅटही त्याच्या हातून निसटली. त्यानंतर त्याने बॅटही बदलली. यासंदर्भात इशान किशन म्हणाला की, खरं तर बॅट हातून निसटली ही माझी चूक होती. पण बॅट बदलून मी जगाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला की, ग्रीपमध्ये समस्या होती. एवढेच नाहीतर आयुष्यात काही चुका झाल्या. त्या वाटेला न जाता टीम इंडियासोबत टिकून राहयचं आहे, हेही त्याने बोलून दाखवले. 

दोन वर्षांहून अधिककाळ टीम इंडिया बाहेर होता इशान किशन, कारण...

इशान किशन याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड झाली असताना मानसिक थकवा जाणवतो, असे कारण सांगत मालिकेतून माघार घेतली होती. टीम इंडियासोबत असताना प्लेइंग इलेव्हमनध्ये संधी मिळत नसल्यामुळे त्याने माघार घेतल्याचेही त्यावेळी बोलले गेले. यात दुबईतील पार्टीचे त्याचे फोटो समोर आले अन् बीसीसीआयने त्याच्यावर राग काढत त्याला संघाबाहेर ठेवले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमक दाखवल्यामुळे त्याची थेट टी-२० वर्ल्ड कपसाठीच्या संघात निवड झाली. आता तो ही निवड साध्य ठरवताना दिसत आहे.

Web Title : IND vs NZ: हार्दिक पांड्या की सलाह, इशान किशन की तूफानी पारी!

Web Summary : न्यूजीलैंड के खिलाफ वापसी करते हुए इशान किशन ने हार्दिक पांड्या की जोरदार हिटिंग की सलाह का खुलासा किया। किशन ने बताया कि कैसे पांड्या की सलाह से उन्हें 76 रन की तेज पारी खेलने में मदद मिली। उन्होंने अपने छूटे हुए बल्ले की घटना को भी संबोधित किया, इसे पकड़ की समस्या बताया और टीम के प्रति प्रतिबद्धता पर ध्यान केंद्रित किया।

Web Title : IND vs NZ: Hardik Pandya's advice, Ishan Kishan's explosive innings!

Web Summary : Ishan Kishan revealed Hardik Pandya's advice to hit powerfully after his comeback innings against New Zealand. Kishan shared how Pandya's tip helped him score a quickfire 76. He also addressed his dropped bat incident, attributing it to a grip issue and focusing on team commitment.