Suryakumar Yadav On Ishan Kishan After IND vs NZ 2nd T20I Mach : रायपूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील सलग दुसरा सामना जिंकून आपला दबदबा कायम राखला. न्यूझीलंडच्या संघाने दिलेल्या २०९ धावांचा पाठलाग करताना सलामीवीर तंबूत परतल्यावर इशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांचा जलवा पाहायला मिळाला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी धमाकेदार शतकी भागीदारी करत न्यूझीलंडच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. एवढेच नाहीतर इशान बाद झाल्यावर सूर्यानं नाबाद राहून १५ व्या षटकात सामना संपवला. २०० धावांचा पाठलाग करताना सर्वात वेगाने विजय नोंदवण्याचा विश्वविक्रम भारतीय संघाने आपल्या नावे केला. या विश्वविक्रमी विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवनं दोन वर्षांनी टीम इंडियात कमबॅक करणाऱ्या इशान किशनच्या शानदार खेळीच खास शब्दांत कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तो काय खाऊन आला होता माहित नाही, पण....
सामन्यानंतर प्रेंझटेशनच्या वेळी इशान किशनच्या खेळीसहच त्याने आपल्या 'बोलंदाजी'ला सुरुवात केली. सूर्या म्हणाला की, इशान किशनने दुपारी लंचला काय खाल्लं होतं किंवा मॅचपूर्वी कोणता प्री-वर्कआउट घेतला होता, हे मला माहित नाही. पण ६ धावांवर २ विकेट्स पडल्या असताना तो ज्या पद्धतीने खेळला तशी खेळी मी याआधी कुणी केल्याचे पाहिलेले नाही. सलामीवीर तंबूत परतल्यावर कोणताही दबाव न घेता पॉवर प्लेमध्ये त्याने संघाच्या धावफलकावर ६७-७० धावा लावल्या. हे अविश्वसनीय होते.
IND vs NZ : SKY ची हायफाय इनिंग; इशानचा शानदार शो! टीम इंडियाचा वेगवान विजयाचा नवा विक्रम
पॉवर प्लेमध्ये इशानवर रागावला होता सूर्या, म्हणाला...
२०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना याच पद्धतीने खेळणं अपेक्षित असते. तो बिनधास्त अंदाजात खेळून इशानने अशा परिस्थितीत कसे खेळायचे ते दाखवून दिले. पॉवरप्लेमध्ये त्याने मला स्ट्राइक दिली नाही. त्यामुळे मला त्याचा रागही आला होता. पण ते ठीक आहे. मला काही वेळ मिळाला. ८-१० चेंडू खेळलो. वेळ घेतल्यावर स्ट्राइक रेट कव्हर करू शकतो, याची मला खात्री होती, असे सांगत इशानमुळे ट्रॅकवर येणं अधिक सोपे झाले, असेही त्याने कबूल केले.