IND vs NZ 2nd T20I Suryakumar Yadav T20I Half Century : भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात इशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी षटकार चौकारांची बरसात करत खास फटकेबाजीचा नजराणा पेश केला. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मालिकेत अखेर 'सूर्या'च 'ग्रहण' ही सुटले. न्यूझीलंडच्या संघाने दिलेल्या २०९ धावांचा पाठलाग करताना कर्णधार सूर्यकुमार यादव आपल्या जुन्या अंदाजात फटकेबाजी करताना दिसून आले. त्याने अवघ्या २३ चेंडूत शतक झळकावले. विशेष म्हणजे २३ डाव आणि ४६८ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर त्याच्या बॅटमधून ही अर्धशतकी खेळी आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!याआधी २०२४ मध्ये झळकावले होते शेवटचे अर्धशतक
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय टी-२० कर्णधाराने आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील २२ वे अर्धशतक साजरे केले. याआधी त्याने १२ ऑक्टोबर २०२४ मध्ये शेवटचे अर्धशतक झळकावले होते. हैदराबादच्या मैदानात रंगलेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर 'सूर्या'ला जणू 'ग्रहण'च लागले होते. मागील वर्षी २१ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात त्याने फक्त २१८ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतही तो अपयशी ठरला होता.
IND vs NZ : बॅट हातून निसटली; पण ग्रीप नाही सुटली! इशान किशनने शानदार फिफ्टीसह मैफिल लुटली
सूर्या भाऊ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा गाजवण्यासाठी तयार
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो, अशी चर्चाही रंगली. पण सूर्यानं आपल्या फलंदाजीतील ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. तो चालला की, सामना फिरवतो. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात इशान किशनच्या आक्रमक अंदाजामुळे त्याला वेळ मिळाला अन् आधी संयमी अंदाजात खेळणाऱ्या सूर्यानं गियर बदलून तुफान फटकेबाजी केली. या सामन्यात त्याने ३७ चेंडूत नाबाद ८२ धावांची खेळी केली. त्याची ही खेळी ९ चौकार आणि ४ षटकारांसह बहरलेली होती.
टी-२० कारकिर्दीत ४ शतके
सूर्यकुमार यादवनं आतापर्यंतच्या आपल्या टी-२० कारकिर्दीत १०१ सामन्यात २२ अर्धशतकांसह ४ शतके झळकावली आहेत. छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ग्लेन मॅक्सवेल आणि रोहित शर्मा पाठोपाठ सूर्याचा नंबर लागतो. येत्या काळात तो या दोघांच्या रेकॉर्डशी बरोबरी साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Summary : Suryakumar Yadav roared back to form in the second T20I against New Zealand, smashing a blistering fifty after a 468-day wait. He reached the milestone in just 23 balls, showcasing his signature aggressive style as India chased down a challenging target.
Web Summary : न्यूजीलैंड के खिलाफ दूसरे टी20 मैच में सूर्यकुमार यादव ने 468 दिन बाद शानदार अर्धशतक जड़कर फॉर्म में वापसी की। उन्होंने सिर्फ 23 गेंदों में यह मुकाम हासिल किया और भारत को चुनौतीपूर्ण लक्ष्य का पीछा करने में मदद की।