India vs Emgland Test Squad Anounnced Update : आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या चक्राला सुरुवात करणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआय भारतीय संघाची घोषणा कधी करणार? यासंदर्भातील माहिती समोर आलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याआधी रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे या दिग्गजांची उणीव भरून काढण्यासाठी बीसीसीआय निवड समिती कोणत्या खेळाडूंवर भरवसा दाखवणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. शुबमन गिल कसोटी संघाच्या नेतृत्वासाठीच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
कधी होणार टीम इंडियाची घोषणा?
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआय निवड समितीकडून शनिवारी २४ मे रोजी दुपारी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात येऊ शकते. मुंबई येथे पत्रकार परिषदेत भारतीय संघासह नव्या कर्णधाराच्या नावाची पुष्टी करण्यात येणार अल्याची माहिती समोर येत आहे. अजित आगरकर यांच्यासह टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरही या पत्रकार परिषदेत दिसू शकतो.
असा आहे भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा
- १३ जून ते १६ जून - बेकेनहॅम येथे ४ दिवसीय सराव सामना
- २० जून ते २४ जून - हेडिंग्ले, ली - पहिला कसोटी सामना
- २ जुलै ते ६ जुलै - बर्मिंगहॅम, एजबॅस्टन - दुसरा कसोटी सामना
- १० जुलै ते १४ जुलै - लंडन, लॉर्ड्स - तिसरा कसोटी सामना
- २३ जुलै ते २७ जुलै - मँचेस्टर, ओल्ड ट्रॅफर्ड - चौथा कसोटी सामना
- ३१ जुलै ते ४ ऑगस्ट - लंडन, ओव्हल - पाचवा कसोटी सामना