Join us

VIDEO: जहांपनाह, तुसी ग्रेट हो... तिलक वर्माच्या दमदार खेळीला सूर्याकडून अनोखी मानवंदना

Suryakumar Yadav Tilak Varma Video, Ind vs Eng 2nd T20 : सूर्यकुमारने केलं तिलक वर्माचं अनोख्या शैलीत कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 17:52 IST

Open in App

Suryakumar Yadav Tilak Varma Video, Ind vs Eng 2nd T20 : तिलक वर्माच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धची दुसरी टी२० जिंकली. प्रथम फलंदाजी करताना जोश बटलरच्या ४५ धावांच्या मदतीने इंग्लंडने ९ बाद १६५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून तिलक वर्माने अखेरपर्यंत झुंज देत नाबाद ७२ धावांची खेळी केली. सुरुवातीला आक्रमक खेळणारा तिलक वर्मा शेवटच्या टप्प्यात काहीसा संयमी खेळताना दिसला. त्याच्या या खेळीचे सर्वत्रच कौतुक झाले. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने केलेली कृती मन जिंकणारी ठरली.

सूर्यकुमारने केलं तिलक वर्माचं अनोख्या शैलीत कौतुक

दुसऱ्या टी२० सामन्यात टीम इंडियाचा युवा फलंदाज तिलक वर्माने चमकदार कामगिरी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला तिलकने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या शानदार अर्धशतकामुळे भारताने सलग दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. सामना संपताच भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव मैदानात गेला आणि तो तिलक वर्मासमोर थेट नतमस्तक झाला. सूर्याच्या त्या कृतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते दोघांमधील बाँडिंग आणि सूर्याच्या कृतीचे भरभरून कौतुक करत आहेत.

तिलकने कसा जिंकवला सामना?

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जोश बटलर (45) आणि जेमी स्मिथ (२६) यांनी थोडी झुंज दिल्यामुळे इंग्लंडने शंभरी गाठली. त्यानंतर तळाच्या फलंदाजांमध्ये ब्रायडन कार्स याने १७ चेंडूत ३१ धावा करत इंग्लंडला १६५ पर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, ध्रुव जुरेल आणि हार्दिक पांड्या हे पाचही फलंदाज स्वस्तात माघारी परतले. तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. तिलक वर्मा फटकेबाजी करत असताना वॉशिंग्टन सुंदर (२६) बाद झाला. त्यामुळे आपोआपच तिलक वर्मावर सामना जिंकवून देण्याची जबाबदारी आली. त्याने मग आक्रमक पवित्रा सोडत संयमी खेळ दाखवला. शेवटच्या षटकात भारताला ६ चेंडूत ६ धावांची गरज होती. तेव्हा पहिल्या चेंडूवर २ धावा आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावत तिलक वर्माने सामना जिंकवला.

टॅग्स :भारत विरूद्ध इंग्लंड २०२५सूर्यकुमार अशोक यादवतिलक वर्माभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघइंग्लंड