IND vs BAN Live Streaming : जो संघ जिंकणार तो फायनल गाठणार; पराभूत संघाला अजून एक संधी मिळणार!

भारत-बांगलादेश यांच्यातील T20I मधील हेड टू हेड रेकॉर्ड (IND vs BAN T20I Head To Head Record)

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 04:43 IST2025-09-24T04:34:23+5:302025-09-24T04:43:20+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN Asia Cup 2025 Super 4 Match Date Time Live Streaming Predicted Playing XI Other Details | IND vs BAN Live Streaming : जो संघ जिंकणार तो फायनल गाठणार; पराभूत संघाला अजून एक संधी मिळणार!

IND vs BAN Live Streaming : जो संघ जिंकणार तो फायनल गाठणार; पराभूत संघाला अजून एक संधी मिळणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs BAN Asia Cup 2025 Super 4 Match Date Time Live Streaming Predicted Playing XI : भारत-बांगलादेश हे दोन संघ दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात रंगणाऱ्या सामन्यात आशिया चषक स्पर्धेच्या फायनलचं तिकीट बूक करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. भारतीय संघाने साखळी फेरीतील हॅटट्रिकनंतर सुपर फोरमधील पहिल्या लढतीत पाकिस्तान विरुद्ध विजयी चौकार मारलाय. दुसरीकडे काटावर पास होऊन सुपर फोर गाठलेल्या बांगलादेशच्या संघाने आपल्या गटातील टॉपर श्रीलंकेला दणका देत यंदाच्या हंगामात फायनलची दावेदारी भक्कम केलीये. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

जो जिंकेल तो संघ थेट फायनल गाठेल; पराभूत संघालाही दुसरी संधी मिळणार

आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोरमधील भारत-बांगलादेश यांच्यातील लढतीला IPL मधील Qualifier 1 सारखे स्वरुप प्राप्त झाले आहे. यात जो जिंकेल तो ४ गुण आपल्या खात्यात जमा करत थेट फायनल गाठेल. याशिवाय पराभूत संघाला या फेरीतील आपला अखेरचा सामना जिंकून फायनलमध्ये धडक मारण्याची दुसरी संधी मिळेल. इथं एक नजर टाकुयात IND vs BAN यांच्यातील सामना कुठं अन् कसा पाहता येईल? कसा आहे दोन्ही संघातील आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील हेड टू हेड रेकॉर्ड? अन् थेट फायनल गाठण्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन यासंदर्भातील सविस्तर माहिती

Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?

भारत-बांगलादेश यांच्यातील T20I मधील हेड टू हेड रेकॉर्ड (IND vs BAN T20I Head To Head Record)

  • दोन्ही संघातील एकूण T20I सामने- १७
  • भारतीय संघ - १६ विजय
  • बांगलादेश संघ -१ विजय
  • दोन्ही संघातील अखेरचा सामना १२ ऑक्टोबर २०२४ रोजी हैदराबादच्या मैदानात खेळवण्यात आला होता. या सामन्यासह मागील ५ सामन्यात भारतीय संघानेबाजी मारलीये.


बांगलादेशविरुद्ध कशी असेल भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन? (Team India Predicted Playing XI vs Bangladesh)

 शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

टीम इंडियाविरुद्ध कशी असेल बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन? (Bangladesh Probable XI vs India)

सैफ हसन, तनझिद हसन तमीम, लिटन दास (कर्णधार/यष्टीरक्षक), तौहिद ह्रदोय, शमीम हुसेन, जाकेर अली, महेदी हसन, नसुम अहमद, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान.


भारतात कुठं अन् कसा पाहता येईल IND vs BAN यांच्यातील मॅच? (India vs Bangladesh, Super Fours Live Streaming And Telecast In India)

  •     लाईव्ह स्ट्रीमिंग : SonyLIV अ‍ॅप आणि वेबसाइटसह फॅनकोड 

     

  •     टेलिव्हिजन: 
  •     सोनी स्पोर्ट्स (Sony Sports 1) आणि सोनी स्पोर्ट्स ५ (Sony Sports 5) (इंग्रजी समालोचन) 
  •     सोनी स्पोर्ट्स ३ (Sony Sports 3) (हिंदी समालोचन)
  •     सोनी स्पोर्ट्स ४ (Sony Sports 4) (तमिळ अन् तेलगू समालोचन)

Web Title: IND vs BAN Asia Cup 2025 Super 4 Match Date Time Live Streaming Predicted Playing XI Other Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.