Abhishek Sharma Record Most Sixes Mens T20 Asia Cup : आशिया चषक स्पर्धेतील बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माच्या भात्यातून आणखी एक अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली. पाकिस्तान विरुद्धच्या हुकलेला शतकी डाव तो बांगलादेशविरुद्ध साधणार असे वाटत असताना दुर्देवाने तो धाबवाद झाला. पण ७५ धावांवर तंबूत परतण्याआधी त्याने आशिया चषक स्पर्धेतील मोठा विक्रम आपल्या नावे केला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग सिक्सर किंग होण्याचा डावही साधला
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात पहिला षटकार मारताच त्याने टी-२० आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत असलेल्या रोहित शर्माला मागे टाकले. इथंच न थांबता पहिल्यांदा आशिया कप स्पर्धेत खेळताना पाचव्या सामन्यातील पाचव्या डावात ५ षटकार मारत तो या स्पर्धेतील नवा षटकार किंग झाला आहे. याआधी अफगाणिस्तानच्या रहमानुल्ला गुरबाझच्या नावे होता. अभिषेक शर्मानं त्याचा विक्रम मोडला आहे.
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
अफगाणिस्तानच्या रहमानुल्ला गुरबाझच्या विक्रमाला सुरुंग अभिषक शर्मानं बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातील ५ उत्तुंग षटकार मारले. आतापर्यंतच्या पाच सामन्यातील पाच डावात त्याच्या खात्यात आता १७ षटकार जमा झाले आहेत. तो टी-२० आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरलाय. आफगाणिस्तानच्या नजीबुल्लाह झादरान याने २०१६ ते २०२२ या कालावधीत १५ षटकार मारल्याचे पाहायला मिळाले होते.
टी-२० आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
- अभिषेक शर्मा (भारत) ५ सामन्यातील ५ डावात १७ षटकार
- रहमानुल्ला गुरबाझ (अफगाणिस्तान) ८ सामन्यातील ८ डावात १५ षटकार
- बाबर हयात (हाँगकाँग) ८ सामन्यातील ८ डावात १४ षटकार
- नजीबुल्लाह झादरान (अफगाणिस्तान) ८ सामन्यातील ८ डावात १३ षटकार
- रोहित शर्मा (भारत) ९ सामन्यातील ९ डावात १२ षटकार