ICC Women's World Cup 2025 IND W vs AUS W 2nd Semi Final : फीबी लिचफिल्डच्या भात्यातून आलेली विक्रमी सेंच्युरी, एलिसा पेरीचं अर्धशतक आणि अखेरच्या षटकात ॲशली गार्डनर हिने तुफान फटकेबाजीसह केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने सर्व बाद ३३८ धावा करत टीम इंडियासमोर ३३९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण कर्णधार आपला निर्णय सार्थ ठरवण्यात अपयशी ठरली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमनजोत कौरनं टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
ऑस्ट्रलियन संघाची कर्णधार एलिसा हीलीच्या रुपात संघाला २५ धावांवर पहिला धक्का बसला. पण त्यानंतर फीबी आणि एलिसा पेरी जोडी जमली. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी दीडशे धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियन संघाला मजबूत स्थितीत नेले. अमनजोत कौरनं फीबी लिचफिल्डच्या ११९ (९३) रुपात भारतीय संघाला दुसरी विकेट मिळवून देत टीम इंडियाला मोठा दिलासा दिला.
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
एलिसा पेरीसह गार्डनरच्या भात्यातून आले अर्धशतक
त्यानंतर श्री चरणीनं आपल्या फिरकीतील जादू दाखवताना बेथ मूनी २४ (२२) आणि ॲनाबेल सदरलँड ३ (६) यांना स्वस्तात माघारी धाडले. राधा यादवनं एलिसा पेरीला ७७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये धाडले . अखेरच्या षटकात गार्डनर भारतीय गोलंदाजांवर तुटून पडली. ऑस्ट्रेलिया संघ धावफलकावर ३५० पेक्षा अधिक धावा करेल, असेच चित्र निर्माण झाले होते. पण ती ४५ चेंडूत ६३ धावांवर धावबाद होऊन परतली. ऑस्ट्रेलियन संघाचा डाव ३३८ धावांच आटोपला. अखेरच्या षटकात दीप्तीनं बॅक टू बॅक दोघींना तंबूत धाडल्यावर रनआउटच्या रुपात ऑस्ट्रेलियाला १० वा धक्का दिला.
इतिहास रचण्यासाठी बॅटिंगमध्ये स्मृतीसह या चौघींवर असेल मोठी जबाबदारी
ऑस्ट्रेलियान दिलेल्या धावांचा यशस्वी पाठलाग करायचा असेल तर टीम इंडियाकडून सलामीची बॅटर स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्यावर संघाला दमदार सुरुवात करुन देण्याची मोठी जबाबदाही असेल. स्मृती यंदाच्या हंगामात कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. दुसरीकडे प्रतीका रावल दुखापतग्रस्त झाल्यामुळे शफालीला वर्ल्ड कप स्पर्धेत वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळाली आहे. मॅचला कलाटणी देण्याची क्षमता या युवा बॅटरमध्ये आहे. याशिवाय कर्णधार हरमनप्रीत, हरलीन देओल आणि जेमिमासह फलंदाजीत अमनजोत कौर आणि रिचा घोष यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.