Join us

IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत

धावफलकावर ५० धावा लागण्याआधीच भारताचा अर्धा संघ तंबूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 14:47 IST

Open in App

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रंगला आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं पुन्हा एकदा टॉस वेळी कमनशिबी ठरला. मिचेल मार्शन टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर जोश हेडलवूनं भेदक माऱ्यासह टीम इंडियाला धक्क्यावर धक्के दिले. सलामीवर शुबमन गिलच्या रुपात हेजलवूडनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. एवढेच नाही तर तिलक वर्माला आणि सूर्यकुमार यादवच्या रुपात हेजलवडूनं पहिल्या तीन षटकात तीन विकेट्स घेतल्या. नॅथन एलिसनं संजू सॅमसनच्या रुपात घेतलेल्या एका विकेटशिवाय अक्षर पटलेच्या रुपात धावबादच्या रुपात तंबूत परतला. धावफलकावर ५० धावा लागण्याआधी भारताचा अर्धा संघ तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशुभमन गिलसूर्यकुमार यादवतिलक वर्मासंजू सॅमसनअक्षर पटेल