IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत

धावफलकावर ५० धावा लागण्याआधीच भारताचा अर्धा संघ तंबूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 14:47 IST2025-10-31T14:42:42+5:302025-10-31T14:47:41+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs AUS 2nd T20 Australia Josh Hazlewood Strikes Again India Tilak Varma Goes For A Duck Shubman Gill Suryakumar Yadav Flop Show | IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत

IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत

IND vs AUS 2nd T20 Australia Josh Hazlewood Strikes Again India : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रंगला आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं पुन्हा एकदा टॉस वेळी कमनशिबी ठरला. मिचेल मार्शन टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर जोश हेडलवूनं भेदक माऱ्यासह टीम इंडियाला धक्क्यावर धक्के दिले. सलामीवर शुबमन गिलच्या रुपात हेजलवूडनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. एवढेच नाही तर तिलक वर्माला आणि सूर्यकुमार यादवच्या रुपात हेजलवडूनं पहिल्या तीन षटकात तीन विकेट्स घेतल्या. नॅथन एलिसनं संजू सॅमसनच्या रुपात घेतलेल्या एका विकेटशिवाय अक्षर पटलेच्या रुपात धावबादच्या रुपात तंबूत परतला. धावफलकावर ५० धावा लागण्याआधी भारताचा अर्धा संघ तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले. एका बाजूला महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत महिला क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजय मिळवला असताना सूर्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघातील आघाडीच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

अवघ्या ४९ धावांवर टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय टी-२० संघाचा उप कर्णधार १० चेंडू खेळून जोश हेजलवूडच्या जाळ्यात अडकला. या सामन्यात संजू सॅमसन याला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली. पण तोही नॅथन एलिसच्या गोलंदाजीवर फसला. ४ चेंडूत २ धावा करून त्याने तंबूचा रस्ता धरला.  पाचव्या षटकात जोश हेजलवूडनं तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवला अवघ्या एका धावेवर माघारी धाडले. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या तिलक वर्माला तर त्याने खातेही उघडू दिले नाही. ३२ धावांवर भारतीय संघाने आपली चौथी विकेट गमावली.  सलामीवीर अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेलवर सर्वांच्या नजरा खिळल्या असताना ही जोडी फुटली. अक्षर पटेल ७ धावा करून धावबादच्या रुपात विकेट फिकली. भारतीय संघाने ४९ धावांवर पहिल्या पाच विकेट्स गमावल्या. 

टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...

४ षटकात ३ विकेट्स

ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शनं या सामन्यात जोश हेजलवूडकरवी सलग चार षटके गोलंदाजी करून घेतली. त्याने आपल्या कोट्यातील ४ षटकात १३ धावा खर्च करत ३ विकेट्स घेत टीम इंडियाच्या आघाडीला सुरुंग लावण्याचे काम केले. वनडेत त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. पण त्याला विकेटच्या रुपात म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. पण अ‍ॅशेस  मालिकेआधी विश्रांती घेण्याआधी जोश हेजलवूडनं आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिली आहे.  

Web Title: IND vs AUS 2nd T20 Australia Josh Hazlewood Strikes Again India Tilak Varma Goes For A Duck Shubman Gill Suryakumar Yadav Flop Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.